lungs  
health-fitness-wellness

आता फुफ्फुसांचे आजार विसरा! पुढील गोष्टींचं नियमितपणे सेवन करा आणि राहा निरोगी  

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण सतत कामात असल्यामुळे आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे अनेकांना थंडीच्या दिवसांत श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच थंडीत फुफ्फुसांचे अनेक आजार होण्याची संभावना असते. कोरोनासारखे आजारही याच काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांना अधिक हानी पोहोचण्याची संभावना असते. मात्र आता घाबरू नका. तुमच्या फुफ्फुसांना कुठल्याही आजारापासून दूर ठेवण्यासाठी पुढे दिलेल्या काही गोष्टींचं सेवन करा. 

या पदार्थांना आहारात नक्की स्थान द्या 

विविध भाज्या 

पालक, पत्ताकोबी आणि केळ या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असतात. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे फुफ्फुस आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या बी-कॅरोटिनमुळे कुठल्याही प्रकारचे रोग होत नाहीत. म्हणून या भाज्या फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहेत. 
  
फळं

आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे फळांचं सेवन करणं महत्वाचं आहे. मात्र फळांमध्येही व्हिटॅमिन 'सी' असलेल्या फळांचं सेवन करणं महात्वाचं आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार नियमितपणे लिंबू, संत्री, मोसंबी अशाप्रकारची फळं खाल्ल्यामुळे श्वसनासंदर्भातील आणि दम्यापासून संरक्षण होतं. त्यामुळे फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी हे फळं खाणं महत्वाचं आहे. 

ब्रोकोली 

कुठल्याही आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमितपणे ब्रोकोलीचं सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. ब्रोकोलीत सल्फोराफेन नावाचा अँटीइंफ्लेमेटरी पदार्थ असतो ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांमध्ये कुठल्याही प्रकारचे विषारी पदार्थ प्रवेश करू शकत नाहीत. तसंच इतर सर्व आजारांपासून बचाव करण्याचं कामही ब्रोकोली करते.   

गाजर

फुफ्फुसांना आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गाजर उपयुक्त आहेत. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं जे तुमच्या फुफ्फुसांना आजारांपासून दूर ठेवतं. विशेष म्हणजे जी लोकं धूम्रपान करतात त्यांच्या फुफ्फुसांसाठीसुद्धा गाजर फायदेशीर आहेत. धूम्रपान करण्याऱ्या लोकांनी नियमितपणे गाजर खाल्ल्यास कँसरसारख्या रोगापासूनसुद्धा बचाव करता येईल. 

जांभूळ 

जांभळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे फुफ्फुसांच्या अनेक समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतात. तसाच यामध्ये असलेल्या फ्लेवोनॉइडमुळे वयानुसार कमी होत जाणाऱ्या फुफ्फुसांच्या कार्याला  गती मिळत नाही. यामुळे फुफ्फुस सुरक्षित राहण्यास मदत होते.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT