Healthy Food Sakal
health-fitness-wellness

थंडीत हेल्दी राहायचंय? हे सात पदार्थ खा

हिवाळ्यात व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा अन्नात समावेश करणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसात वातावरण एकदम बदललय, वातावरणात गारवा कमालीचा वाढलाय, मध्येमध्ये पाऊसही पडतोय. अशावेळी आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजचे आहे. सध्या थंडी खूप पडत असल्याने लोक आराम करणे पसंत करतात. परिणामी शरिराची हालचाल कमी होते. या कमी झालेल्या गतिशीलतेमुळे अपचन, जळजळ आणि कधीकधी मनःस्थिती देखील बिघडते. त्यामुळे हे सगळे टाळण्यासाठी हिवाळ्यात व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा अन्नात समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम तर व्हालच, पण तुमच्या शरीरातील उत्साह टिकून राहील.

carrot

गाजर -गाजर हे व्हिटॅमिन बी ६ ने परिपूर्ण असून हिवाळ्यात ते खाणे अत्यंत फायद्याचे आहे. एका मध्यम आकाराच्या गाजरापासून एक ग्लास दुधाइतके व्हिटॅमिन बी ६ मिळते. तसेच गाजर हे फायबर, व्हिटॅमिन एचा उत्तम स्त्रोत आहे.

Drinking Milk

दूध -आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी ६ ने परिपूर्ण असणारे दूध हा अत्यंत चांगला स्त्रोत आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांनी दूध पिणे आवश्यक आहे. थंडीत गरम दूध प्यायल्यास आराम मिळेल.

banana

केळी- वजन कमी करायचे असेल तर रोज केळे खाणे महत्वाचे आहे. केळं खाल्ल्याने व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त़ विविध अँटिऑक्सिडंट्स, फायबरही मोठ्या प्रमाणात मिळतात.

spinach

पालक -पालकात लोह, फोलेट आणि पोटॅशियम असते. हिवाळ्यात तुम्ही रोजच्या जेवणात पालकाचे विविध प्रकार करून तो जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा.

Egg

अंडी - थंडीत तुम्हाला उबदार ठेवण्याबरोबरच हेल्दी राहण्यासाठी अंड खाणे फायद्याचे आहे, तुम्ही ऑम्लेट किंवा उकडूनही ते खाऊ शकता.

चिकन लिव्हर- हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. व्हिटॅमिन बी व्यतिरिक्त त्यात फोलेट आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे थंडीत हा पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.

Peas

मटार- हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ताजे मटार मिळतात. त्यात व्हिटॅमिन बी-6 चांगल्या प्रमाणात असते. मटार घालून थंडीत तुम्ही विविध पदार्थ करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT