Increase your iron intake naturally 
health-fitness-wellness

शरीरात आर्यनची कमतरता असल्यास सावधान

आरोग्य तज्ज्ञांच्या मते लोह हिमोग्लोबिनचा महत्वाचा घटक आहे

भक्ती सोमण-गोखले

तुमच्या शरीरात (Body ) लोहाची ( Iron) कमतरता असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात लोह हे अत्यंत आवश्यक पोषक तत्व असून ते शरीरात ऑक्सिजन (oxygen) पोहोचवण्याचे काम करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते लोह हिमोग्लोबिनचा महत्वाचा घटक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात. शरीरातल्या लाल रक्तपेशी कमी प्रमाणात असल्यास त्याला लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला एनीमिया म्हणतात. भारतात पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये एनीमियाची समस्या जास्त आढळते. लोह कमी असल्याची लक्षणे लोकांना सहज आणि लगेच कळत नाहीत.

Tips for Reduce Hair Fall & Dandruff

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, श्वास घ्यायला त्रास होणे, बेशुद्ध पडणे, डोकेदुखी, हृदयाची गती वाढणे, हात-पाय थंड पडणे, केस गळणे, तोंड येणे, घसा खवखवणे, जीभ सुजणे आदी प्रकार दिसून येतात.

small kids doing yoga

शरीराला इतकी आहे गरज

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे वय, लिंग, तसेच त्याच्या तब्येतीवर त्याला लोहाची किती गरज आहे ते अवलंबून असते. नवजात बालकांना आणि लहान मुलांची वाढ पटापट होत असल्याने मोठ्यांच्या तुलनेत त्यांना लोहाची जास्त गरज असते. लहानपणी मुला-मुलींना समप्रमाणात लोहाची आवश्यकता असते. ४ ते ८ वय असलेल्यांना रोज १० मिलीग्रॅम, ९ ते १३ वय असलेल्यांना रोज ८ मिलीग्रॅम लोहाची आवश्यकता असते. तर महिलांना मासिक पाळीदरम्यान शरीरातून भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १९ ते ५० वयोगटातील महिलांनी दररोज १८ मिलीग्रॅम लोह घेणे गरजेचे आहे. तर समान वयोगटातील पुरूषांना ८ मिलीग्रॅम लोह पुरेसे आहे. तर गर्भवती आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या बायका, किडनीचा आजार असलेले, अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया, खूप जास्त व्यायाम करणारे लोक तसेच शाकाहारी लोकांनी अधिक प्रमाणात लोह घ्यावे असा सल्ला डॉक्टर देतात.

मटार (वाटाणा) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते.

या पदार्थांचा करा समावेश

चिकन, अंडी, मासे, डाळी,मटार, फरसबीसारख्या शेंगा, पालक, हिरवे वाटाणे, ब्रोकोली, कडधान्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. शरीरात लोहाचे प्रमाण चांगले असावे यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : 2014ला अदानी महाराष्ट्रात एका ठिकाणी होते, आता...; राज ठाकरेंनी नकाशाच दाखवला

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT