health-fitness-wellness

प्रेग्नंसीनंतरच्या कंबरदुखीला 'गुडबाय' करायचं असेल तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

शर्वरी जोशी

आई होण्यासारखं सुख  कशात नाही असं कायम म्हटलं जातं. त्यामुळे आई होणं ही जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. परंतु, आई होणं वाटतं तितकं सोपं नाही. एका नव्या जीवाला जन्म देत असताना स्त्रियांना प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आई होणं अत्यंत कठीण आहे. विशेष म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतरही महिलांना अनेक शारीरिक त्रासांना सामोरं जावं लागतं. यात अनेक जणींनी मासिक पाळीचा त्रास, पाठदुखी, कंबरदुखी, अपूर्ण झोप अशा समस्या निर्माण होतात. यात कंबरदुखीचा त्रास तर ८० टक्के महिलांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेग्नंसीनंतर होणाऱ्या कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आहारात फळे, भाज्या अशा सकस पदार्थांचा समावेश केला पाहिजे. मात्र, यातही नेमकी कोणती फळे खावीत किंवा आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे आज जाणून घेऊयात. 

१. फळे व भाज्या -

फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्वांचा समावेश असतो. त्यामुळे प्रेग्नंसीनंतर आहारात रसदार फळे आणि भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा. तसंच ज्या पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे असेही पदार्थ नियमित आहारात घेतले पाहिजेत. सोबतच गाजर, रताळे,चेरी, द्राक्ष, डाळिंब, कलिंगड अशा फळांचंही सेवन केलं पाहिजे. या फळांमुळे शरीरावर आलेली सूज कमी होते आणि पाठ किंवा कंबरेचं दुखणं दूर होतं.

२. कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि प्रोटीनचा समावेश -

आहारात जर कॅल्शिअम आणि व्हिटामिन डी चं प्रमाण पुरेपूर असेल तर पाठदुखी व कंबरदुखी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात दूध, दही, पनीर, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश करावा. पोटॅशिअममुळे मांसपेशी मोकळ्या होतात व दुखणं कमी होतं. तर केळी आणि  रताळे  यांच्यामध्ये पोटॅशिअम जास्त असतं. चिकन, मटन, अंडी, टोफू, सोया मिल्क, बदाम यामधून प्रोटीन मिळतं.

३. ओमेगा 3  -

ओमेगा 3  फॅटी अॅसिडमध्ये अॅटी-इंफ्लोमेट्री गुण असतात, ज्यामुळे कंबरदुखी आणि मानेचा त्रास कमी होतो. त्यामुळे सॅल्मन, ट्यूना असे मासे जास्त खावेत. या माशांमधून ओमेगा 3  फॅटी अॅसिड मिळते. तर, शाकाहारी लोकांनी टोफू, कॅनोल ऑइल, अक्रोड, पालेभाज्या खाव्यात.

४. लसूण -

लसणामुळे शरीरातील वात दूर होतो. त्यामुळे प्रग्नंसीनंतर लसणाचा वापर वाढवावा. लसणामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी ३-४ लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचा रस काढा. त्यानंतर यात १ कप पाणी टाकून  १ चमचा मध मिसळा. त्यानंतर दिवसातून दोनदा हे पाणी प्या. दररोज हा उपाय केल्यास कंबरदुखी दूर होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT