health-fitness-wellness

वयाच्या तिशीनंतर कुटुंब नियोजन करताय? मग 'या' गोष्टींचा नक्की विचार करा

शर्वरी जोशी

सध्याच्या काळातील अनेक जण त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतांना दिसतात. त्यामुळे सहाजिकच त्यांचं कुटुंब व्यवस्थेकडे आणि कुटुंब नियोजनाकडे दुर्लक्ष होताना दिसतं. यामध्येच अनेक जोडपी करिअरच्या नादात फॅमेली प्लॅनिंग करतात. त्यामुळे स्त्रियांचं आई होण्याचं वय तिशीच्या पार होतं. खरं तर, मातृत्वाचा अनुभव घेणं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आई होण्याच्या या प्रवासात महिलेचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. परंतु, काळाच्या ओघात करिअर, उशीरा विवाह, आर्थिक अस्थिरता आणि आरोग्याच्या विविध समस्या यामुळे अनेक जोडपी ठरवून गर्भधारणा पुढे ढकलतात. त्यामुळे जर आपण वयाच्या तिशीनंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर अशा महिलांना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वाढत्या वयात गर्भधारणा झाल्यास अनेक समस्या उद्भव शकतात. म्हणून उशीरा गर्भधारणेचा विचार करत असाल तर डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे.

उशीरा गर्भधारणेचा विचार करणं योग्य किंवा अयोग्य?

१. आता अनेक स्त्रिया करिअरला प्राधान्य देतात, त्यानंतर कुटुंब नियोजन करतात. याशिवाय बहुतांश जोडपी आर्थिक स्थिरता आणि एखाद्या मुलाची जबाबदारी आपण स्विकारू शकू का? याचा विचार करून मुलाला जन्म द्यायचा की नाही हे ठरवतात. वाढत्या वयानुसार गर्भाशयात तयार होणाऱ्या बिजांची संख्या कमी होते. अशावेळी ३० व्या वयात गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. म्हणूनच एखाद्या जोडप्याला विवाहानंतर गर्भधारणा पुढे ढकलायची असल्यास फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

२. ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर या विकाराने पिडीत महिला गर्भधारणेची योजना पुढे ढकलत असेल, तर अशा महिला आपले स्त्री-बीज फ्रिजिंग करून ठेवू शकतात. कारण ऑटोइम्युनिटीमुळे महिलेच्या अंडाशयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे अंडाशयातील अंडी तयार होण्याची संख्या घटू शकते. याशिवाय महिलेला कर्करोग किंवा हायपरथायरॉईडिझम यांसारखे आजार उद्भवू शकतात. मुळात, उपचार सुरू असताना एखादी महिला गर्भवती राहिल्यास तिच्या गर्भातील बाळावर या औषधांचा परिणाम होऊ शकतो. या महिला अनेक वर्षांपासून उपचार घेत असल्याने गर्भधारणा करू शकत नाहीत. त्यामुळे अशा त्रास असलेल्या महिलांनी उपचार सुरू करण्यापूर्वी अंडी फ्रिजिंग करण्यासाठी ठेवावीत.

३. कोणतीही स्त्री स्वतःची स्त्री-बीज(अंडी) फ्रिझ करून ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. जर महिला विवाहित असल्यास तिचे स्त्री-बीज आणि पुरूषांचे शुक्राणू फ्रिजिंगसाठी ठेवता येऊ शकतात. जर महिला अविवाहित असल्यास ती फक्त स्वतःचे स्त्री-बीज फ्रिझ करू शकते.

४. कोणतीही स्त्री वेळेत आपली प्रजनन क्षमता गोठवण्याची योजना आखू शकते, जर तिचे लग्न झाले असेल तर ती तिचे गर्भ (गर्भा = अंडे + शुक्राणू) किंवा ती अविवाहित असेल तर तिचे ऑयोसाइट्स (अंडी) क्रायोप्रीझर (गोठवणे) निवडू शकते. एंडोमेट्रिओसिस ग्रस्त महिलांनी नंतरच्या वेळेस गर्भधारणेची योजना आखली पाहिजे कारण एंडोमेट्रिओसिस ही अशी स्थिती आहे जी काळानुसार वाढत जाते, म्हणूनच आपण अविवाहित नसल्यास आधीच्यापेक्षा गर्भधारणा करणे योग्य ठरेल.

५. महिलांना असलेल्या अनेक आरोग्यविषयक समस्यांपैकी एंडोमेट्रिओसिस ही एक आरोग्य समस्या आहे. या समस्येनं पिडीत महिलांनी गर्भधारणेची योजना पुढे ढकलली पाहिजे. कारण एंडोमेट्रिओसिस हा आजार काळानुसार वाढत जातो. यावर योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.

६.तुम्ही गर्भधारणा पुढे ढकलत असाल तर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ३५ वर्षाहून अधिक वयाच्या आणि पहिल्यांदाच गर्भवती महिलेला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा महिलांना गर्भारपणात मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणा पुढे ढकलण्याचा विचार करण्यापूर्वी जोडप्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कृपया लक्षात ठेवा की केवळ मुलं जन्माला घ्यालण्यासाठीच नव्हेतर मुलाला जन्म दिल्यानंतरही महिलेचे आरोग्य तंदुरूस्त राहणे गरजेचं आहे. त्यामुळे गर्भवती राहण्याचे नियोजन विवाहानंतर लगेचच केले पाहिजे.
एका नाण्याच्या नेहमीच दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक जोडप्याने तिशीनंतर कुटुंब नियोजनाचा विचार करताना यामुळे होणारे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंचा विचार करणं गरजेचं आहे. फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

(लेखिका डॉ. रितू हिंदूजा या मुंबईतील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी रुग्णालयात फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत.)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT