HIV Aids Symptoms esakal
health-fitness-wellness

HIV Aids Symptoms : 'ही' लक्षणं दिसली तर सावध व्हा, असू शकतात एड्सचे पूर्व संकेत

एड्स हा आजार एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होतो, त्याचा संसर्ग झाल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.

सकाळ डिजिटल टीम

HIV AIDS Symptoms : काही आजार हे सायलेंट किलर असतात असं म्हटलं जातं. बऱ्याचदा अशा आजारांची लक्षणं नीट कळत नसल्यानं त्यांचं निदान पण उशिरा होतं. त्यामुळं हे आजार वाढलेल्या अवस्थेतच निदान केले जातात. पर्यायाने त्यावरचे उपचारही उशिरा सुरू झाल्याने पूर्ण बरं होण्याच्या शक्यता थोड्या कमी होतात. HIV AIDS हा त्यातलाच एक आजार आहे.

त्यामुळे याची काही लक्षणं आधीच लक्षात आली तर उपचार लवकर सुरू करता येतात. जाणून घ्या लक्षणं.

एड्स हा आजार एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होतो, त्याचा संसर्ग झाल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे जर पुढील लक्षणं वारंवार दिसत असतील तर सावधगीरी बाळगणं आवश्यक आहे.

  • एड्सची लक्षणे

या आजारावर पूर्ण उपचार आतापर्यंत शक्य झालेले नाहीत, त्यामुळे त्याची लक्षणे जाणून' घेणे खूप गरजेचे आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला एड्सच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत.

  • मासिक पाळीतील बदल

जर महिलांना एचआयव्ही विषाणूची लागण झाली असेल तर त्यांच्या मासिक पाळीत बदल होऊ शकतात, मासिक पाळी सामान्यपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.

  • लिम्फ नोड्समध्ये सूज

लिम्फ नोड्स हे रोगप्रतिकारक शक्तीचा भाग असतात, ते मानेच्या, डोक्याच्या मागच्या भागात, बगलात आणि मांडीवर असतात, एचआयव्हीची लागण झाल्यावर लिम्फ नोड्सची सूज दिसून येते.

  • वजन कमी होणे

एड्सच्या आजारात भूक मंदावते आणि हळूहळू वजन कमी होऊ लागते.

  • सतत पोटाच्या समस्या

एचआयव्हीची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या पोटात काही समस्या कायम राहतात, उलट्या किंवा मळमळण्याची समस्या देखील असू शकते.

  • ताप

एड्सच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे फ्लू, ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे असू शकते.

  • शरीरावर पुरळ उठणे

शरीरात पुरळ येणे हे एचआयव्हीचे सर्वात सामान्य लक्षण आहे, लाल पुरळ जवळजवळ संपूर्ण शरीरावर • दिसू शकतात, खाज सुटू शकते.

  • थकवा जाणवणे

जर तुम्हाला एचआयव्ही विषाणूची लागण झाली असेल तर तुम्हाला सतत थकवा जाणवेल, शरीर दुखणे देखील होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT