how to care when using wet wipes  
health-fitness-wellness

वेट वाइप्स वापरताना काय काळजी घ्याल?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - सध्या स्वच्छता आपल्या आय़ुष्यातील महत्वाचा भाग बनलाय. मग ते शरीराची असो किंवा परीसराची. चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी आपण घरी असताना चेहरा साबणाने धुतो. मात्र, बाहेर गेल्यानंतर ते शक्य नसतं. त्यामुळे आपण वेट वाइप्सचा वापर करत असतो. पण, वेट वाइप्स वापरताना घ्यावयाची काळजी बऱ्याच जणांना माहिती नसते.

अशी घ्या काळजी -

  • जंतूनाशक वाइप्स चेहऱ्यावर अजिबात वापरू नका. त्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, सूज येणे यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. वाइप्समधील रसायनांमुळे हे घडू शकते. त्यामुळे चेहऱ्यासाठी साधे वेट वाइप्स तुम्ही वापरू शकता. 
  • एकच वाइप्स परत वापरला तर ते धोकादायक ठरू शकतं. एखाद्या वस्तूचा पृष्ठभाग स्वच्छ केल्यानंतर तोच वाइप्स वापरल्यास जिवाणू आणि विषाणू घरभर पसरू शकतात. त्यामुळे शक्यतो हे टाळाच.
  • वाइप्स फळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरू नका. सफरचंद, नाशपती अशी फळे स्वच्छ करण्यासाठी वाइप्सचा चुकूनही वापर करू नका. ते धोकादायक ठरू शकतं. तसेच फळे पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्या.
  • वाइप्सची योग्य विल्हेवाट - वाइप्स टॉयलेयमध्ये फ्लश केले तर पाइपमध्ये अडकून पाणी तुंबण्याची शक्यता असते. ते पर्यावरण आणि माणसाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे झाकण असलेल्या कचराकुंडीमध्येच वाइप्स टाकून द्या.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT