Water Between Workout  Esakal
health-fitness-wellness

व्यायामाच्या आधी अन् नंतर किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत

व्यायामादरम्यान पाणी पिण्याची सवय असल्यास सावधान...

सकाळ डिजिटल टीम

व्यायाम केल्याचे फायदे सगळ्यांना माहिती आहे. पण व्यायाम योग्य प्रकारे करणे जास्त महत्वाचे आहे. असे केले नाही तर शरीराला (Body) अपाय होऊ शकतात. त्यामुळे व्यायाम (Exercise) करण्याच्या आधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला व्यायाम करताना किंवा व्यायामाच्या आधी पाणी (Water) प्यावे का याविषयी योग्य माहिती दिली जात नाही. पण व्यायाम करताना काही नियम पाळावे लागतात. त्यानुसार तुमच्या पाणी पिण्याच्या पद्धतीतही बदल करावे लागतात. तसे केले नाही तर शरीराला अपाय होऊ शकतो. म्हणून व्यायामदरम्यान पाणी कसे प्यावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

व्यायामाच्या आथी पाणी प्यायची पद्धत

काही लोकं व्यायामादरम्यान पाणी पिण्याची गरज लागू नये म्हणून आधीच पाणी पितात. व्यायाम करताना शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पण व्यायामाच्या आधी पाणी प्यायल्याने तब्येत बिघडू शकते. व्यायामाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे योग्य ठरते. एकावेळी भरपूर पाणी पिऊ नका. घसा ओला करण्यासाठी जेवढे पाणी पिणे आवश्यक आहे तेवढेच प्या.

exercise

व्यायामानंतर कधी पाणी प्यावे -

व्यायामानंतर घाम येतो, दम लागतो. त्यामुळे साहजिकच घसा कोरडा पडतो. व्यायामामुळे शरीर गरम होते. त्यामुळे लोकं लगेच पाणी पितात. पण असे करणे योग्य नाही. यामुळे तुमच्या स्नायूंना धक्का पोहोचतो. त्यामुळे छातीत दुखणे, पोटदुखी, उल्टी अश्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे व्यायामानंतर २० ते २५ मिनिटांनी पाणी प्यावे. कारण तोवर तुमच्या शरीराचे तापमान सामान्य झालेले असते.

पाणी पिण्याचा हा नियम कार्डिओपासून पिलेट्स, योगासने, धावणे, किक-बॉक्सिंग, वेट ट्रेनिंग या सर्व प्रकारच्या व्यायामांना लागू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT