Viral infection esakal
health-fitness-wellness

संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले! लहान मुले बाधित होत असल्याने चिंतेत भर

लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने बच्चेकंपनीचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

सकाळ वृत्तसेवा

देवळा (जि. नाशिक) : पावसाळी वातावरण, विषम हवामान तसेच दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा संसर्गजन्य आजारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. चिंतेची बाब म्हणजे यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. (Latest Marathi News)

येथील कसमादे भागात गेल्या १०- १५ दिवसांपासून सलग पावसाळी वातावरण असल्याने थंड हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने बच्चेकंपनीचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. दूषित हवा, पाणी, अन्नासोबत प्रदूषित परिसर यामुळे आजारांचे प्रमाण वाढते आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झाल्याने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक गावातील मोकळ्या भूखंडांवर गवत वाढल्याने विंचू, साप यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे असा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खबरदारी घ्यायला हवी.

''पालकांनी या अशा पावसाळी वातावरणात लहान मुलांची काळजी घ्यावी. शक्यतो घरातीलच अन्नपदार्थ खाण्याचा आग्रह धरावा. पाणी उकळून पाजावे. एकाचा आजार दुसऱ्याला होणार नाही यासाठी संपर्क खंडित करावा. आजाराची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.'' - डॉ. देवेंद्र चव्हाण, निर्मल बालरुग्णालय, देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT