health-fitness-wellness

आईने बाळाला स्तनपान करावे की नाही ?

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि. नागपूर) : सध्या कोविड-19 महामारीमुळे (Coronavirus) बरेच लोक खूप तनावपूर्ण मनःस्थितीत आहे. त्यात मुखतः गरोदर महिला व अशा महिला ज्या बाळाला स्तनपान (Feeding mothers) करतात. त्या या संसर्गाने संक्रमित झाल्या तर त्या आपल्या बाळाच्या आरोग्याविषयी फार चिंतीत असतात. अशा परिस्थीतीत स्तनपान करणारी माता व कुटूंबातील व्यक्ती हे समजू शकत नाही की बाळाला आईचे दूध (Mother's Milk) पाजावे की नाही, त्याला सुध्दा संसर्ग होईल का? अशा प्रकारच्या विविध प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. त्यावेळी त्यांना योग्य माहिती व मार्गदर्शनाची आवश्यकता असते, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण खापेकर यांनी व्यक्त करीत स्तनपान करणाऱ्या मातांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहे. ग्रामीण भागातील स्तनपान करणाऱ्या महिलांच्या मनात अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहे. त्या सर्व प्रश्नांचे निराकरण डॉ. खापेकर यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. (Is it safe to feed children by covid positive mothers)

प्रश्न --- पाॅजिटीव्ह मातेने जर आपल्या बाळाला दूध पाजले तर त्याचे काय फायदे आहेत व बाळाला संसर्ग होण्याची शक्यता किती असते आणि दूध नाही पाजले तर त्याने काय नुकसान होते ?

उत्तर - आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे. त्यात एन्टी इन्फेक्टीव्ह प्राॅपर्टी म्हणजे इम्यूनोग्लोबीन व WBC Natural Killer Cells सारखे गुण असतात. जे बाळाला संक्रमणापासून वाचवू शकतात. कोविड पाॅजिटीव्ह मातेच्या दूधात कोरोना विरूध्द एन्टीबाॅडी तयार होतात. जर आईने बाळाला दूध पाजले तर ते एन्टीबाॅडी बाळाला मिळतात. ज्यामुळे बाळाला संसर्गापासून पूर्णपणे वाचवता येत नसले तरी त्याला या संसर्गामुळे होण-या गंभीर श्वासाच्या समस्येपासून वाचवते. याचा दूसरा फायदा असा आहे की आईने बाळाला प्रसुतिनंतर लगेच दूध पाजल्यामुळे त्यांच्यात एक आत्मीयता निर्माण होते व आई तनावमुक्त होते तसेच गरोदरपणात पोस्टमार्टम डिप्रेषन सारख्या समस्या होण्याची शक्यता कमी असते व एका सफल स्तनपानाला सुरवात होते.

प्रश्न - कोविड संक्रमित मातेने स्तनपान केल्याने बाळाला संसर्ग होण्याची शक्यता किती असते का?

उत्तर - जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने ४६ गरोदर मातांच्या ब्रेस्ट मिल्क नमुन्यांचे परिक्षण केले. त्यात केवळ २ ते ३ नमुन्यातच वायरसचे काही स्ट्रेन्स मिळाले. त्यासोबतच हे ही पाहिल्या गेले की, जर आई पूर्णपणे काळजी घेवून प्रत्यक्ष स्तनपान करते. तर बाळाला संसर्ग होतो किंवा नाही. या दोन्ही गोष्टींच्या निष्र्कषावरून हे सिध्द झाले की बाळाला संसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते.

प्रश्न - कोविड पाॅजिटीव्ह मातेने बाळाला दूध पाजल्याने होणारे नुकसान व त्यामुळे मुलांच्या भविष्यावर होणारे परिणाम ?

उत्तर - जर आपण कुठलाही विचार न करता बाळाला आईपासून १० दिवसांकरिता वेगळे केले तर ब-याच वेळा आईला १० दिवसानंतर दूध येणे बंद होते. त्यामूळे बाळ वरच्या दूधावरच राहतो. ज्यामुळे बाळाला वारंवार जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. वरच्या दूधाचा खर्च हा कुटूंबाच्या एक त्रितीऔंष मिळकती ऐवढा असतो. जो गरीब कुटूंबासाठी खूप न परवडया सारखा असतो. तसेच वरचं दूध पिणारे मुलं भविष्यात चिडचिडपना, लठ्ठपणा, रक्तदाब व मधूमेह सारख्या आजाराला बळी पडतात व अशा मुलांचा एफ लेवल सुध्दा आईचे दूध पिणा-या मुलांपेक्षा कमी असतो.

प्रश्न - जर गरोदर माता कोविड पाॅजिटीव्ह असेल तर ती प्रसुति नंतर बाळाला स्तनपान करू शकते का ?

उत्तर - जर गरोदर मातेला सौम्य लक्षणं आहेत तिला श्वसनाची समस्या नाही, तर ती पूर्णतः सावधगिरी बाळगून प्रसूतीनंतर बाळाला प्रत्यक्ष स्तनपान करू शकते. जर मातेला थोडेफार लक्षणं आहेत श्वास घेण्यास त्रास होत आहे, न्युमोनिया आहे तर ती आपले दूध काढून कटोरी चम्मचने पाजू शकते. परंतू माता जर खूप गंभीर अवस्थेत आहे, तिला आॅक्सिजन लागले आहे किंवा तीची अवस्था स्तनपान करण्यास सक्षम नाही. तर तेव्हा आपल्या समोर वेट नर्सिंग, डोनर ब्रेस्ट मिल्क किंवा फार्मूला मिल्क या पर्यायाने बाळाला दूध देवू शकते. परंतू जशी आई बाळाला स्तनपान करण्यास सक्षम झाली तेव्हा बाळाला प्रत्यक्ष दूध पाजू शकते.

प्रश्न - जर कोविड पाॅजिटीव्ह माता आपल्या बाळाला दूध पाजत नाही आहे, आई व बाळाला वेगळे ठेवण्यात आले तर अशा अवस्थेत काय करावे ज्यामुळे आईला दूध येत राहील?

उत्तर - प्रसुतिच्या ६ तासाच्या आत हाताने किंवा ब्रेस्ट पंप दूध काढले पाहिजे, मुख्यतः दूस-या व तिस-या दिवशी जेव्हा मातेचे स्तन दूधाने भरून जातात तेव्हा दूध योग्य रूपाने काढले पाहिजे. जर असे नाही केले तर मातेमध्ये दूध बनने बंद होऊन हळू-हळू दूध सुकुन जाईल. काढलेले दूध बाळाला पाजू शकतो व त्याला साठवून सुध्दा ठेवू शकतो.

प्रश्न - माता बाळाला स्तनपान करीत आहे अशा अवस्थेत मातेला कोविड झाले तर बाळाला दूध पाजने बंद करावे का?

उत्तर - जर मातेला सौम्य लक्षणं आहेत, श्वसनास त्रास होत नाही आणि बाळ आईच्या दूधावरच आहे तर अशा परिस्थितीत कुठल्याही गोष्टींचा विचार न करता मातेला बाळाच्या वेगळे करण्याची गरज नाही. माता पूर्णपने खबरदारी घेवून आपले दूध बाळाला पाजू शकते. बरेचदा काही विचार न करता बरेच लोकं मातेला बाळापासून १० दिवसांकरिता वेगळे करून घेतात व बाळाला वरचे दूध पाजने सुरू करतात. परिणाम स्वरूप १० दिवसानंतर बाळ आईचे दूध पिण्यास नकार देतो ज्याचा बाळाच्या भविष्यातील आरोग्यावर प्रभाव पडतो.

जागतिक आरोग्य संस्था म्हणते की, जर कोविड पाॅजिटीव्ह मातेची अवस्था स्तनपानास अनुमती देते तर बाळाला आईचेच दूध पाजावे. बाळाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते व बाळाचे भविष्यातील आरोग्य उत्तम राहते.

(Is it safe to feed children by covid positive mothers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT