chocolate
chocolate canva
health-fitness-wellness

डार्क चॉकलेटचे सेवन नियमित करू शकतो का? वाचा काय आहे नुकसान

भाग्यश्री राऊत

नागपूर : चॉकलेट जवळजवळ प्रत्येकाला आवडते. कोकोपासून बनवलेल्या चॉकलेटमध्ये एक वेगळी चव होते. तसेच या चॉकलेटचे सेवन केल्याने हॅप्पी हार्मोन सिक्रेट होतात, असे देखील बोलल जाते. परंतु, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना बर्‍याचदा चॉकलेटमध्ये असलेल्या कॅलरी आणि साखरेची चिंता असते. ते टाळण्यासाठी अनेकजण डार्क चॉकलेटचे सेवन करतात. मात्र, डार्क चॉकलेट खरोखर आरोग्यदायी आहे का? आपण रोज डार्क चॉकलेट खाऊ शकता का? याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपण किती चॉकलेट खावे?

डार्क चॉकलेट खाणे चांगले आहे. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि इतर खनिजे देखील आहेत. हे अँटीऑक्सिडेंटने देखील भरलेले आहे, जे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहित करण्यास मदत करू शकते. अभ्यासानुसार, ते आपल्यास रक्त प्रवाह सुधारू शकतो आणि रक्तदाब नियंत्रित करू शकतो. चॉकलेट खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकजण डार्क चॉकलेट खातात. परंतु, या चॉकलेटचे अधिक सेवन करताना त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचले का? याची खात्री करा. कारण लेबलवर लिहिलेले असते, की यामध्ये साखरेचे प्रमाण किती आहे.

अर्थातच डार्क चॉकलेट हे आरोग्यदायी आहे कारण त्यात पॉलिफेनोल्स आणि फ्लेव्होनॉइड्स आहेत जे इंसुलिनची संवेदनशीलता वाढविण्यास, आपली मनःस्थिती वाढविण्यास, साखर संतुलित करण्यात आणि भूक शांत करण्यास मदत करतात. मात्र, ते खूप खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. दिवसांत फक्त दोन चौकोनी तुकड्यांपर्यंत डार्क चॉकलेटचे सेवन मर्यादीत असायला पाहिजे. अन्यथा ते आपल्या आहारात जास्त साखर आणि चरबी वाढवू शकते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT