health-fitness-wellness

मलायका अरोरा मालदीवमध्येही शांत कुठे? व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मलायका अरोरा आणि अर्जून कपूर सध्या मालदिवमध्ये एकत्र सुट्टी घालवत आहेत. तिथे अर्जून तिच्याबरोबर आहे तरी तिला चैन पडत नाहीये. हे चैन न पडण्याचं कारण म्हणजे योगा. मलायका दर सोमवारी मलायका मुव्ह्ज ऑफ द विकमध्ये फिटनेस, योगाबद्दल इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती मालदिवमध्ये आहे. त्यामुळे फिटनेस व्हिडिओ नसेल असेच तिच्या चाहत्यांना वाटले. मात्र तिने व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने योगा नव्याने शिकणाऱ्या लोकांसाठी काही आसने सांगितली आहेत. ती केल्याने तुमचे पाय टोन्ड होण्यास मदत होईल. मलायकाच्या त्या पोझेस आवडत्या असून करायलाही ही आसने सोपी आणि प्रभावी आहेत. मलायकाने या आसनांचे महत्वही सांगितले आहे.

उत्कटासन(The Chair Pose)- तुमचे शरीर टोन करण्यास हे आसन मदत करते, त्यामुळे तुमच्या शरीराचे संतुलन सुधारते. तसेच हे आसन क्वाड्रिसेप आणि ग्लूटल स्नायूंना लक्ष्य करते. ही पोझ करत असताना काही सेकंद तसेच राहा. शरीराची ताकद वाढल्यावर कधी थांबायचे ती वेळ ठरवा.

मलासन (The Garland Pose)- तुमचे पाय आणि मांड्या मजबूत करण्यासाठी हे उत्तम आसन आहे. या आसनामुळे शरीराच्या खालच्या भागातील कडकपणा दूर होतो. ही पोझ किमान २० सेकंद केल्याने शरीराला फायदा होतो.

अधो मुख्य शवासन (Downward Facing Dog Pose) - मलायकाच्या गो- टू पोझपैकी हे आसन असून ते केल्याने शारिरिक मानसिक आरोग्यासाठी फायदा होतो. तुमच्या हाता-पायाला खोलवर ताण मिळतो. त्यामुळे हॅमस्ट्रिंग(गुडघ्याच्या मागच्या दोन स्नायूंना जोडणारा दोरीसारखा दिसणारा स्नायू), गुडघे आणि हात टोन होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT