रजोनिवृत्ती रजोनिवृत्ती
health-fitness-wellness

रजोनिवृत्ती निसर्गचक्राचा भाग; सकारात्मक भावनेतून बघा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात दृष्टीने बदल घडायला सुरुवात होते. रजोनिवृत्ती आजार नाही. निसर्गचक्राचा हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.

जसेजसे वय वाढते तसे तसे हाडांतील कॅल्शिअमचे प्रमाण घटत जाते. रजोनिवृत्तीमध्ये स्त्रीला देणारी हार्मोन्सची पातळी रक्तातील व हाडांतील कॅल्शिअमचे प्रमाण संतुलित ठेवते. त्यामुळे हाडांतील कॅल्शिअम वेगाने निघून जायाला लागते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. याला ऑस्ट्रीयोपोरेसिस म्हणतात.

यामुळे जरासे पडण्याने मांडीची, हातांची हाडे मोडण्याची शक्यता असते, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती डॉ. कांचन गोलावार यांनी दिली. गुडघे, टाचांमध्ये दुखणी सुरू होतात. हाडांची झीज होऊ लागते. कंबरदुखी, पाठदुखी सुरू होते. मानेच्या स्पॉन्डेलायटीसची सुरुवात होते. त्यामुळे चक्कर येणे, मान दुखणे, हाताला मुंग्या येणे आदी त्रास सुरू होतात, असे त्यांनी सांगितले.

शरीरावर होणारे परिणाम

  • गर्भाशयाच्या तोंडाचा आकार लहान होतो

  • गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अशक्त होतात

  • गर्भपिशवी आकाराने कमी होते

  • अंडाशय लहान होते

  • इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॅान नामक हार्मोन्स कमी होतात

  • गर्भपिशवी खाली आल्याने मूत्रमार्गावरील नियंत्रण कमी होते

मानसिक आरोग्य बिघडते

  • चिडचिडेपणा वाढतो

  • सहनशीलता कमी होणे

  • अंग एकदम गरम वाटायला लागते

  • घाम सुटणे, अंग एकदम थंड पडणे

  • डोकेदुखी जाणवत राहणे

  • छातीत धडधड होणे

  • झोप न लागणे

रजोनिवृत्तीमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे त्वचेची कांती कमी होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. केस पातळ होणे, वजन वाढणे या गोष्टी होतात. महिलांनी रजोनिवृत्तीला आजार न समजता तो निसर्गाची ही प्रक्रिया आहे. सकारात्मक भावनेतून याकडे बघावे. कोणताही त्रास होत नाही.
- डॉ. कांचन गोलावार, प्रसूतीरोग तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT