Mobile Side Effects on Health Google
health-fitness-wellness

डोळेच काय 'या' गोष्टींवरही होतो मोबाईल बघितल्याने परिणाम

लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल वापरत आहेत

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या काळात मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग झाला आहे. लहान मुलांच्या (Children) अभ्यासापासून अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल (Mobile) वापरत आहेत. पण मोबाईलचा हाच अतिवापर धोकादायक ठरू शकतो. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे(Eye) खराब होतात हे माहिती आहेच. पण तुमच्या रोजच्या जगण्यावरही (Lifestyle) मोबाईल जास्त बघितल्यास परिणाम होतो. त्यामुळे वेळीच मोबाईचचा वापर कमी न केल्यास तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. मोबाईल जास्त बघितल्याने तुम्हाला आणखीही काही त्रास होऊ शकतात.(Mobile Side Effects on Health)

dry skin

त्वचेवर मुरूमं- फोनच्या हानिकारक किरणांमुळे ब्रेकआउट होऊ शकते? अनेक संशोधनांमध्ये असे आढळले आहे की मोबाईलमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया असतात. फोन हाताळत असताना तुम्ही चेहऱ्यालाही हात लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूमं आणि काळे डाग येऊ शकतात. तसेच चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाची लक्षण दिसायला लागतात. त्यामुळे तुमचा मोबाईल रोज पुसून स्वच्छ करणे गरजेचे आहे. (Mobile Side Effects in Marathi)

मनगट दुखू शकते- अती फोन वापरल्याचा आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम होऊ शकते. फोनच्या जास्त वापरामुळे मनगटात सुन्नपणा आणि वेदना येऊ शकतात. यामुळे मनगटात मुंग्या येऊ शकतात. सतत सेल्फी काढल्यानेही मनगट दुखू शकते.

stress

तणाव वाढतो- अनेक लोकं तणाव कमी करण्यासाठी मोबाईल बघण्याला महत्व देतात. पण, तुम्हाला इंटरनेटवर काहीतरी वाचणे, फोन बराच वेळ वापरणे, झोप न लागणे अशा कारणांमुळेही फोनचा ताण येऊ शकतो. यावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आजार होऊ शकतात.

nite mobile

झोपण्याची वेळ बदलते- प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघितल्याने झोपेची वेळ कमी होते. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नाही तसेच दिवसा झोपही येत नाही. मोबाईलच्या अतिवापरामुळे कधी कधी निद्रानाश होतो.

Mobile

डोळ्यांवर परिणाम- डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. सतत मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर दाब पडतो. तसेच तुमच्या डोळ्यांचेही खूप नुकसान होऊ शकते. मोबाईलची निळी स्क्रीन सतत पाहून तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यामुळे तीव्र डोकेदुखी, डोळे दुखणे, तसेच डोळे कोरडे होण्याची भिती असते. अशावेळी फोन बघत असताना थोडा ब्रेक घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT