india pollution 
health-fitness-wellness

National Pollution Control Day : का साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस? 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रदुषणाच्या समस्येने फक्त भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच वेठीला धरलं आहे. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रदूषण म्हणजे अशी स्थिती जिथे नैसर्गिक गोष्टी जसं की हवा, पाणी आणि खाण्याच्या गोष्टी अशुद्ध होणे. त्यातून अशुद्धी पसरेल आणि आपल्या आरोग्यासाठी ते हानीकारक बनेल. प्रदुषण अनेक कारणांनी होतं जसं की फटाके फोडणे, हवा-पाण्यात रासायनिक घटक सोडणे, अवाजवी आवाज करणे, विघटन न होऊ शकणारे घटकांचे प्रमाण वाढणे इत्यादी. अलिकडे प्रदुषणाची ही समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढतच चालली आहे. ही सरकारची तसेच सामान्य नागरिकांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी प्रदुषणावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी उपाय करावेत. यासाठी योजना अंमलात आणाव्यात.

हेही वाचा - जागतिक एड्स दिन : काय आहे AIDS? जाणून घेऊया लक्षणे, कारणे आणि त्याविषयी सर्वकाही​
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचा उद्देश
या दिवसाचा मुख्य उद्देश हा आहे की लोकांना वाढत्या प्रदुषणाबाबत अधिकाधिक जागृत करावं. हवा, पाणी, मृदा, ध्वनी या माध्यमात होणारे प्रदूषण फक्त माणसालाच नव्हे तर संपूर्ण निसर्गावर नकारात्मक परिणाम करण्यास कारणीभूत ठरते. याची जाणीव लोकांमध्ये व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वास्तविकत: या दिवसाला भोपाळ वायू दुर्घटनेच्या आठवणीत साजरा केलं जातं. भोपाळ वायू दुर्घटना ही जगातील सर्वांत मोठी औद्योगिक दुर्घटना होती. यामध्ये मिथाईल आयसो सायनेट नावाचा एक विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला होता. ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक अत्यावस्थ जखमी झाले होते. तर त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना अंपगत्व आलं होतं.


भोपाळ वायू दुर्घटना
2 डिसेंबर 1984 रोजी भोपळमध्ये युनियन कार्बाईड कंपनीमधून मिथाईल आयसो सायनेट या वायूची गळती झाली होती. या दुर्घटने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे हजारो लोकांना सामुहिकरित्या दफन केलं गेलं होतं. काही दिवसांनंतरच जवळपास दोन हजार जनावरांचे मृतदेह देखील दफन करावे लागले होते. आसपासच्या परिसरातील झाडे मरुन गेली होती. एकावेळेला जवळपास 17 हजार लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं होतं. सरकारी आकड्यानुसार 2,259 लोकांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला होता. 

मध्य प्रदेश सरकारने या वायूगळतीमुळे झालेल्या मृतांची संख्या 3,787 सांगितली होती. 2006 मध्ये सरकारने कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं ज्यात उल्लेख केला होता की वायूगळतीमुळे एकूण 5,58,125 लोक जखमी झाले आहेत. यामधील 38,487 लोक हे काही काळासाठी अंपग झाले. तर 3,900 लोक हे कायमचेच अपंग झाले. ही दुर्घटना फक्त एवढ्यापुरतीच मर्यादीत नव्हती. तर त्यांच्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलांमध्येही गंभीर प्रकारच्या आरोग्याच्या समस्या पहायला मिळाल्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT