heart attack esakal
health-fitness-wellness

स्त्रियांना पुरूषांपेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक, जाणून घ्या कारणे

महिलांना वर्षाच्या आत दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते

सकाळ डिजिटल टीम

हृदयविकाराचा (heart attack) झटका कोणाहीसाठी धोकादायक असतो. पण पुरूषांच्या (men) तुलनेत स्त्रियांना (women) रूग्णालयात जास्त काळ राहावे लागते. तसेच हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची (death) शक्यता जास्त असते. पुरूषांच्या तुलनेत महिलांना वर्षाच्या आत दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते असे पुरावे सांगतात.स्त्रियांच्या शरीराची कार्यप्रणाली पुरूषांच्या तुलनेत वेगळी असते. तसेच जोखीम आणि रोगनिदानही वेगवेगळे असते. तसे पाहता स्त्रिया कुठलाही त्रास सहन करणाऱ्या असतात. कुटूंबातील गरजांना प्राधान्य देत असल्याने अनेकदा त्या त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्या वैद्यकीय मदत घेण्याची शक्यता कमी असते, असे बंगलोरच्या मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टचे सल्लागार डॉ. मंगेश बालकृष्णन यांनी सांगितले.

acidity and indigestion

लक्षणे ओळखा

लक्षणे सौम्य असल्याने स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका ओळखणे कठीण असू शकते. काहीवेळा नुसती एसिडिटी झाल्चाचे दिसू शकते. महिलांमध्ये छातीत दुखणे किंवा अस्वस्थता ही लक्षणे कमी दिसून येतात. श्वास लागणे, ओटीपोटात अस्वस्थता, चक्कर येणे, पाठीच्या वरच्या भागात दाब, खूप थकवा येणे यासारखी लक्षणे पुरूषांच्या तुलनेत जास्त वेळा जाणवू शकतात. हा फरक दोघांच्या शरीरातील रक्तवाहिन्यांच्या फरकामुळे निर्माण होतो, पुरूषांमध्ये मुख्य धमनीत ब्लॉक निर्माण होतो. तर स्त्रियांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांना जास्त धोका पोहोचून त्या प्रभावीत होतात.

Obesity

ही परिस्थिती कारणीभूत

लठ्ठपणा, आधीपासून असलेली हृदयाची स्थिती, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टरॉल, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, अल्कोहोलचा गैरवापर आणि धुम्रपान ही स्त्रियांमधील हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास ४,५०,००० रुग्णांचा समावेश असलेल्या एका अभ्यासात मधुमेह असलेल्या स्त्रियांना पुरुषांपेक्षा दृदयविकाराचा धोका पन्नास टक्के जास्त असतो, असे आढळले आहे.

तसेच वृद्ध पुरूषांपेक्षा वृद्ध महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. तरुण स्त्रियांमध्ये, एस्ट्रोजेन हा हार्मोन हृदयविकारांपासून संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजवातो. रजोनिवृत्तीनंतर, इस्ट्रोजेनच्या उत्पादनाची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. प्री-मेनोपॉझल महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचे प्रमाण १४ टक्के जास्त असते आणि लिपिड प्रोफाइल अधिक प्रतिकूल असते. इतर महिलांमध्ये विशिष्ट जोखीम असलेल्या घटकांमध्ये हिस्टरेक्टॉमी आणि गर्भधारणेच्या गुंतागुंत, तसेच गर्भधारणेच्या दरम्यान मधुमेह किंवा प्री-एक्लॅम्पसिया यांचा समावेश होतो.

omega

ही घ्या काळजी

जोखीम जास्त असलेल्या महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करणे, जीवनशैलीत बदल करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका आणि मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतो. जीवनशैलीतील काही महत्वाच्या बदलांमध्ये आहाराद्वारे वजनावर नियंत्रण ठेवणे आणि रोज ३० मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे आहे. आहारात भाज्या आणि फळे, कार्बोहायड्रेट्स आणि मासे किंवा बिया यांसारख्या ओमेगा-3-फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध अन्नाचा समावेश असावा. सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट आणि कोलेस्टेरॉल वाढेल असे तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित प्रमाणात खाने. धूम्रपान करावे आणि अल्कोहोल पिण्यावर मर्यादा असावी. हृदयाच्या आरोग्यास अनावश्यक असलेल्या हार्मोनल औषधांचा वापर केवळ वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यावा. शेवटचे पण महत्वाचे मधुमेह, उच्चरक्तदाब आणि इतर वैद्यकीय स्थितींसाठी डॉक्टरांनी सुचविलेली सर्व औषधे घ्यावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT