Summer Season esakal
health-fitness-wellness

उन्हाळ्यात 'या' दोन आजारांचा धोका; वाढत्या तापमानामुळं लोक पडू लागले आजारी

सकाळ डिजिटल टीम

'आज ऊन जरा जास्तच आहे.' यंदाच्या उन्हाळ्यात तर प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य आहे.

'आज ऊन जरा जास्तच आहे.' यंदाच्या उन्हाळ्यात (Summer Season) तर प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य आहे. खरं तर दरवर्षी कुणी ना कुणी वाढत्या उन्हाविषयी तक्रारींचा पाढा वाचताना दिसतो. पण, यंदा हे वाक्य जरा जास्तच लोकांच्या कानी पडत आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदीही असं बोलण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. बुधवारी (27 एप्रिल) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली. या बैठकीत मोदी म्हणाले, देशातलं तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढू लागलं आहे."

याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, भारतात आलेली उष्णतेची लाट. देशातील सर्वच भागांमध्ये नागरिकांना यंदा उन्हाची झळ बसत आहे. वाढलेल्या उन्हामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, देशात तापमानवाढीचं हे सत्र येत्या आठवडाभर सुरू राहणार आहे. विशेषतः देशाच्या वायव्य आणि मध्य भागात ही तापमान वाढ प्रकर्षाने जाणवेल. तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसची तापमान यादरम्यान जाणवेल. आगामी काही दिवस हीच स्थिती कायम राहील, असंही हवामान विभागानं म्हटलंय.

भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढं गेलं आहे, त्यामुळं लोक आजारी पडू लागलेत. अशा स्थितीत व्हायरल फिव्हर (Viral Fever) आणि डायरिया (Diarrhea) ची लागण झाल्यानं डिहायड्रेशनच्या समस्या (Dehydration Problem) वाढू लागल्या आहेत.

'या' आजारांकडं करू नका दुर्लक्ष

जेव्हा-जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात विषाणूजन्य ताप आणि जुलाबाची चिन्हे दिसू लागतात, तेव्हा जवळच्या रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आवश्यक चाचण्या करून घेणं सर्वात महत्वाचं आहे. हे आजार कसं ओळखायचं ते जाणून घेऊया.

अतिसाराची लक्षणे (Symptoms Of Diarrhea)

  • पोटदुखी

  • मळमळ किंवा उलट्या

  • पोटात जळजळ जाणवणे

  • भूक न लागणे

  • डोकेदुखी होणे

  • ताप येणे

  • सतत तहान

  • स्टूलमध्ये रक्त

  • डिहायड्रेशनची समस्या

व्हायरल तापाची लक्षणे (Symptoms Of Viral Fever)

  • डोकेदुखीचा त्रास

  • डोळे लाल होणे

  • डोळ्यात जळजळ होणे

  • घसा खवखवणे

  • सर्दी होणे

  • अंगदुखी

  • शरीराचे तापमान वाढणे

  • सांध्यांमध्ये वेदना जाणवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT