Scoliosis Surgery
Scoliosis Surgery esakal
health-fitness-wellness

मुलीच्या पाठीचा वाकला होता मणका अन् डॉक्टरांनी लावला 'दोरी'चा नवा कणा!

सकाळ डिजिटल टीम

आजच्या काळात मणक्याशी संबंधित समस्या अनेक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

आजच्या काळात मणक्याशी संबंधित समस्या अनेक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. चुकीच्या पद्धतीने बसणे, गुंतागुंतीची जीवनशैली, दैनंदिन जीवनात व्यायामाचा अभाव, वृद्धत्व, अनियंत्रित मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल (Cholesterol) इत्यादींमुळं मणक्याचा त्रास सुरु होतो. त्याला वैद्यकीय भाषेत स्पॉन्डिलायटिस (Spondylitis) म्हणतात.

काही शारीरिक दुखापत झाल्यास किंवा सेब्रल पाल्सी, मस्क्यूलर डिस्ट्रोफी अशा अनेक कारणांमुळं पाठीच्या कण्यात काही बदल होतात आणि त्या बदलामुळं मग दुखापत होते. या स्थितीला स्कोलियोसिस म्हणतात. अशावेळी पाठीचा कणा एका बाजूला फिरतो आणि ती व्यक्ती एका बाजूला झुकलेली दिसते. नुकतेच एक असे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये 13 वर्षांच्या मुलीलाही असाच त्रास झाला होता. डॉक्टरांच्या (Doctor) टिमने या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दोरीच्या साह्याने मुलीचा मणका आधार देऊन सरळ केला आणि आता ही मुलगी हळूहळू बरी होत आहे. चला तर मग जाणून घेऊया दोरीच्या साहाय्याने मणक्याला कसा आधार दिला असेल?

दुबईत मणक्याचं ऑपरेशन

दोरीपासून मणक्याला आधार देणाऱ्या मुलीचे नाव सलमा नसेर नवसेह असून ती १३ वर्षांची आहे. सलमा ही जॉर्डन या अरब देशाची रहिवासी आहे. दुबईतील बुर्जील हॉस्पिटलमध्ये (Burjeel Hospital Dubai) त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. अशी अनोखी शस्त्रक्रिया करणारी सलमा ही मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील पहिली मुलगी ठरली आहे. सलमाच्या पाठीचा कणा दोरीने दुरुस्त करण्यात आला असून आता ऑपरेशननंतर ती बरी होत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवसापासून सलमाने चालायला सुरुवात केली आहे. सलमाच्या मणक्याला दोरीचा आधार दिला आहे. 13 वर्षांच्या सलमावर काही काळापूर्वी वर्टेब्रल बॉडी टिथरिंग (VBT) शस्त्रक्रिया झाली आहे. या शस्त्रक्रियेमध्ये पेंशटच्या पाठीच्या कण्याला दोरीचा आधार दिला जातो आणि नंतर ती दोरी स्क्रूने घट्ट केली जाते.

मणक्याचे वाकणे योग्य होईपर्यंत स्क्रूच्या मदतीने दोरी घट्ट केली जाते आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत आला की, मग मणक्याच्या प्रत्येक भागात स्क्रू लावले जातात. VBT शस्त्रक्रिया सध्या अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीसह काही देशांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु, उत्तर आफ्रिका प्रदेशात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्रक्रियेनंतर सलमा आता दुबईतील बुर्जील रुग्णालयात उपचार घेऊन बरी होत आहे. लवकरच ती आधीप्रमाणे टेनिस खेळू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Scoliosis Surgery

मिळालेल्या माहितीनुसार, सलमाच्या पालकांना एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदा लक्षात आले होते की, त्यांच्या मुलीचे शरीर हे एका बाजूला झुकले आहे. त्यानंतर त्यांनी लगेच तिला दवाखान्यात दाखवले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीला स्कोलियोसिस आहे. काही वेळा ही समस्या जन्मापासून मुलामध्ये असते. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये स्कोलियोसिस 10-15 वर्षांच्या दरम्यान होतो. स्कोलियोसिसची बहुतेक प्रकरणे ही नॉर्मल असतात त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया आवश्यक नसते. परंतु काही प्रकरणांमध्ये, स्कोलियोसिसमुळे हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. सलमाबद्दल बोलायचे झाले तर तिच्या मणक्यात 65 अंशांचा ट्विस्ट होता. दुबईच्या बुर्जील हॉस्पिटलचे प्रमुख ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. फिरास हुसबन यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले.

डॉ. फिरास यांच्या मते, स्कोलियोसिस हा आजार अनेक लोकांमध्ये दिसून येते. या आजारांच्या रूग्णांवर निरीक्षण, ब्रेसिंग आणि शस्त्रक्रिया अशा तीन प्रकारे उपचार करता येतात. जर एखाद्याला स्कोलियोसिसची नॉर्मल लक्षणे दिसत असतील तर त्यावर ब्रेसिंगद्वारे उपचार केले जाऊ शकतात. परंतु, सलमाच्या मणक्यात खूपच वळणे आले होते, त्यामुळे तिला शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सलमा ही या शस्रक्रियासाठी अगदी योग्य रुग्ण होती. जिची हाडे या आजारामुळे नीट वाढूच शकत नव्हती. आता सलमा शस्त्रक्रियेनंतर बरी होत आहे आणि दोन आठवड्यांनंतर ती शाळेत जाऊ शकेल आणि पुढच्या चार आठवड्यांनंतर ती तिच्या रेग्युलर रुटीनला देखील लागू शकते. याचे कारण असे की शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी सलमाने चालायला सुरुवात केली यावरुन असे लक्षात येते की ती लवकर पूर्वपदावर येऊ शकते.

'या' लोकांवर ही शस्त्रक्रिया होत नाही

2019 मध्ये VBT शस्त्रक्रियेला USFDA ने मान्यता दिली. गतिशीलता आणि लवचिकता राखून मणक्याचे वक्र सुधारू शकणारे हे नवीन तंत्र आहे. या शस्त्रक्रियेत चिरफाड कमी असते आणि धोकाही कमी असतो. परंतु, खांद्याच्या एका बाजूला बाक असलेल्या रुग्णाला VBT शस्त्रक्रिया करता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, ही शस्त्रक्रिया फक्त नऊ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर केली जाते. एखाद्याचा मणका 45 ते 65 अंश वक्र असेल तर VBT शस्रक्रियि अधिक प्रभावी ठरते.

डॉ. फिरास यांच्या म्हणण्यानुसार, "या शस्त्रक्रियेमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी एंडोस्कोपच्या सहाय्याने ओटीपोटात चीरा माराव्या लागतात. VBT दरम्यान पाठीच्या मऊ उतींना काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. स्पाइनल फ्यूजन शस्त्रक्रियेइतकाच रक्तस्राव या शस्रक्रियेत देखील होतो.

'या' शस्रक्रियेनंतर वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो

आता बघूया वर्टेब्रल बॉडी टिथरिंग सर्जरी म्हणजे काय? वर्टेब्रल बॉडी टिथरिंग (VBT) स्कोलियोसिस असलेल्या रुग्णांसाठी एक शस्त्रक्रिया उपचार आहे. ऑगस्ट 2019 मध्ये FDA ने उपचार मंजूर केले होते. या ग्रोथ मॉड्युलेशन ट्रीटमेंटमध्ये रुग्णाच्या पाठीचा कणा एका सरळ रेषेत आणण्यासाठी लवचिक कॉर्डचा वापर केला जातो. इडिओपॅथिक स्कोलियोसिस असलेले काही रुग्ण स्पाइनल फ्यूजन शस्त्रक्रियेऐवजी वर्टेब्रल बॉडी टिथरिंग सर्जरी वापरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT