हाडांची मजबुती अन्‌ त्वचेच्या आरोग्यासाठी बहुगुणी तीळ
हाडांची मजबुती अन्‌ त्वचेच्या आरोग्यासाठी बहुगुणी तीळ esakal
health-fitness-wellness

हाडांची मजबुती अन्‌ त्वचेच्या आरोग्यासाठी बहुगुणी तीळ

प्रकाश सनपूरकर

तिळामध्ये तांबे, मॅंगेनीझ, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम आदी खनिज मोठ्या प्रमाणात असतात.

बोचऱ्या थंडीचा (Cold) जोर वाढू लागला की ऋतू बदलाचे वेध लागण्यास सुरुवात होते. आरोग्यदायी तिळाचा (Sesame seeds) वापर हिवाळ्यात (Winter) तसा उपयुक्त ठरतो. तसे मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सणदेखील याच तिळाच्या आहाराला जोडून येतो. त्यामुळे हिवाळ्यात तिळासोबत आरोग्य व संक्रांतीसारखा सण जोडल्याने त्याचे वेगळे महत्त्व अधोरेखित होते. डिसेंबर महिन्यात हिवाळा अगदी जोरात सुरू असल्याने थंडीचे प्रमाण वाढते. तेव्हा डिसेंबरच्या शेवटच्या कालावधीत मकर संक्रांतीचे वेध लागतात. आरोग्य व संस्कृतीच्या संगमावर असलेल्या तिळाच्या वापराचा उत्साह वाढलेला असतो. (Sesame seeds are good for bone strength and skin health)

मुळातच तीळ हा बहुगुणी मानला जातो. तिळात अँटीऑक्‍सिडंट (Antioxidant) आहे. तिळामध्ये तांबे (Copper), मॅंगेनीझ (Manganese), मॅग्नेशियम (Magnesium), कॅल्शियम (Calcium), आयर्न (Iron), झिंक (Zinc), सेलेनियम (Selenium) आदी खनिज (Minerals) मोठ्या प्रमाणात असतात. तिळामध्ये असलेलं तांबे काही प्रमाणात संधिवातामुळे (Rheumatoid arthritis) होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी मानलं जातं. मॅग्नेशियममुळे रक्त वाहिन्यांबाबतचं (Blood vessels), श्वसनमार्गाबाबतचं आरोग्य (Health) सुधारतं आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात येण्यास मदत होते. तिळात कॅल्शियम व झिंक मोठ्या प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडांची ताकद वाढण्यास मदत होते. तिळामुळे केसांची मुळं घट्ट होतात. तिळात असलेल्या ओमेगा फॅटी ऍसिड्‌समुळे (Omega Fatty Acids केसांची वाढ उत्तम व्हायला मदत होते आणि केसांचं आरोग्यही सुधारलं जातं.

तिळामध्ये अँटीऑक्‍सिडंट्‌स खूप असतात, ज्यामुळे वार्धक्‍याच्या खुणा कमी होतात आणि त्वचा अधिक तरुण दिसायला लागते. तिळात असलेल्या तेलामुळे त्वचेला खूप उपयोग होतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि नरम होण्यास मदत होते. सूज कमी करण्यासाठीचे घटक त्यात भरपूर असतात. काळ्या तिळामध्ये फायबर्स (Fibers) आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड (Unsaturated Fatty Acids) मोठ्या प्रमाणावर असल्यानं बद्धकोष्ठता कमी होते.

ठळक बाबी...

  • त्वचेला तीळ तेलाची मसाज उपयोगी

  • हाडाच्या आजारावर तीळ तेलाचा उपचारात उपयोग

  • बुद्धिवाढ व नेत्राचे आरोग्य वाढते. वार्ध्यक्‍य रोखण्याचा गुण

  • निद्रानाशावर उपचारासाठी तीळ तेलाचा उपयोग

  • बद्धकोष्ठता व मूळव्याधीवर उपचारात उपयोग

तीळ अत्यंत आरोग्यदायी आहे. तिळाचे तेल अनेक आजारांत उपयोगी ठरते. संधिवातामध्ये त्याचा उपयोग चांगला होतो. केसांना भक्कम करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुख्य म्हणजे तीळ तेलात शरीरात खोलवर उतरण्याची सर्वाधिक क्षमता (पेनिट्रेशन पॉवर) असल्याने उपचारांची परिणामकारकता वाढवते. हाडांच्या आजारामध्ये याच क्षमतेमुळे ते प्रभावी ठरते.

- डॉ. वीणा जावळे, स्त्रीरोग तज्ज्ञ (Gynecologist), सोलापूर

तीळ हाडांच्या आजारासाठी अत्यंत गुणकारी आहे. संधिवात व हाडांच्या इतर आजारांसाठी तिळाचा उपयोग चांगला होतो. बडिशेप, जवस व तीळ एकत्र करून दररोज एक चमचा सेवन केले तर महिलांच्या मासिक पाळीच्या अडचणी दूर होतात. तसेच महिलांच्या रक्तातील लोहाची कमतरता भरून काढली जाऊ शकते. भाज्यांमध्ये तिळाची पूड किंवा कूट नियमित वापरणे उपयुक्त ठरते.

- नीलिमा हरिसंग, आहार तज्ज्ञ (Dietitian), जुळे सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT