Broiler Chicken 
health-fitness-wellness

ब्रॉयलर चिकन खाण्यापूर्वी, त्याचे 7 गंभीर परिणाम नक्की वाचा!

सकाळ डिजिटल टीम

नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन हा नित्याचा भाग बनला आहे. शरिराला लागणाऱ्या प्रोटिन्स, कॅल्शियमची कमतरता भरून काढण्याची ताकद मांसाहारात असते. त्यात चिकनमध्ये प्रोटिन्स, कॅल्शियमसह, अमिनो ऍसिड, व्हिटॅमिन बी-3, व्हिटॅमिन बी-6, मॅग्नेशियम यांसारखे शरिराला अत्यावश्यक घटक असतात. त्यामुळं आरोग्यासाठी चिकन  खाण्याचा सल्ला, डॉक्टर्स, न्युट्रिशियन्स यांच्याकडून सर्रास दिला जातो. पण, बाजारात उपलब्ध होणारे ब्रॉयलर चिकन आरोग्यासाठी खरच फलदायी आहे का? हे देखील तपासून घेतले पाहिजे. आम्ही देत असलेल्या माहितीनंतर तुम्ही ब्रॉयलर चिकन खाताना, नक्कीच दहा वेळा विचार कराल?

ब्रॉयलर चिकनची वाढ
ब्रॉयलर चिकन अर्थात कोंबड्यांची वाढ वेगाने होण्यासाठी त्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर रसायने आणि अँटिबायोटिक्सचा समावेश केला जातो. यामुळे अवघ्या 40 दिवसांत त्यांची वाढ होते. त्यामुळे कृत्रिम पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्यांचे मास निश्चितच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः असे चिकन वारंवार खाल्ल्यास त्याचे शरिरावर दुष्परिणाम होऊ शकतात. 

संभाव्य परिणाम
1. कॅन्सरचा धोका
एका रिसर्चनुसार सातत्याने पोल्ट्रीशी संबंधित पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. ब्रॉयलर चिकन उच्च तापमानाला शिजवल्यानंतर हा कॅन्सरचा धोका असल्याचे संशोधनात म्हटले आहे. यातही पुरुषांना या कॅन्सरचा धोका सर्वाधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हल्ली ग्रिल्ड चिकन आवडीने खाल्ले जाते. परंतु, ते सातत्याने खाल्ल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

2. बॅक्टेरिया
कोणत्याही प्रकारचे मांस खाताना, ते स्वच्छ असणे अतिशय महत्त्वाचे असते. अन्यथा त्या माध्यमातून शरिरात मोठ्या प्रमाणावर धोकादायक जिवाणू प्रवेश करू शकतात. आपल्याकडे बहुतांश पोल्ट्री फार्म आणि चिकनमध्ये स्वच्छतेविषयीचे नियम पाळले जात नाहीत. याचा परिणाम तुमच्या ताटात येणाऱ्या चिकनच्या पदार्थांवरही झालेला असतो. त्यामुळे स्वच्छतेच्या अभावी, चिकन खाणाऱ्यांना अनेक किरकोळ आजारांनाही सामोरं जावं लागू शकतं. 

3.सिगारेटपेक्षाही धोकादायक
healthyfoodcn या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, ब्रॉयलर चिकनचा एक लेगपिस हा 60 सिगारेट इतकाच धोकादायक असू शकतो. मुळात चिकन जास्त शिजवल्यामुळं त्यातील प्रोटिनची मात्रा कमी झालेली असते त्यामुळं ते आरोग्यासाठी हानीकारक असतं, असंही संशोधनात म्हटलंय. 

4.फॅट्स 
आपल्या शरिराला चांगला फॅट्सची गरज असते. पण, ब्रॉयलर चिकनमध्ये बॅट फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळं सातत्याने ब्रॉयलर चिकनचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या दिसतात. त्यामुळं ब्रॉयलर ऐवजी देशी कोंबड्यांचे मास खाण्याचा सल्ला दिला जातो. 

5.हानीकारक केमिकल्स 
ब्रॉयलर कोंबड्यांना वजनावर चांगला दर मिळावा यासाठी त्यांची वाढ वेगाने आणि चांगली व्हावी, यासाठी प्रयत्न केला जातो. त्यासाठी आहाराबरोबरच अनेकदा या कोंबड्यांना इंजेक्शन्सही दिला जाता. त्यातून त्यांच्या शरिरात हानाकारक केमिकल्सचा शिरकाव झालेला असतो. त्याच कोंबडीचे मांस आपण खल्ल्यास ती केमिकल्स आपल्या शरिरात प्रवेश करतात. परिणामी, लठ्ठपणाबरोबरच, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणे, मुलींमध्ये वयात येण्याविषयीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

6.अँटिबायोटिक्स 
ब्रॉयलर चिकनच्या वाढीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर अँटिबायोटिक्स दिली जातात. परिणामी, आठवड्यातून तीनवेळा ब्रॉयलर चिकन खाणे म्हणजे, तीन वेळा अँटिबायोटिक्स इंजेक्शन टोचून घेतल्यासारखे असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

7. पुरुषांवर गंभीर परिणाम
सातत्याने ब्रॉयलर चिकन खाणाऱ्या पुरुषांच्या ओरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसत आहेत. विशेषतः प्रजनन क्षमतेवर मोठे परिणाम दिसतात, त्यात स्पर्मस् अर्थात शुक्राणूंची ताकद कमी होण्यासारख्या गंभीर परिणामांचाही समावेश आहे. त्यामुळं नपुसंकत्व येण्याचाही धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT