throat infection 
health-fitness-wellness

गळ्यात खरखर होण्याची असू शकतात 'ही' कारणं, जाणून घ्या घरगुती उपाय

सकाळ वृत्तसेवा

Health And Fitness
सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही कोरोना व्हायरसची सर्वसाधारण लक्षणे आहेत. मात्र, अनेकदा साधा ताप येणं, सर्दी होणं किंवा घशात खरखर होणं अशी लक्षणे आपल्यात वर्षातून दोन-तीन वेळा नक्की दिसतात. त्यामुळे सर्दी किंवा घशात खरखर होत असल्यास लगेच घाबरुन जाऊ नये. घशातील खरखर काही घरगुती उपायांनी कमी केली जाऊ शकते.  

अॅसिडिटी, अल्कोहोलचे नियमित सेवन, फ्लू, गळ्यातील इंफेक्शन, टॉन्सिल यांमुळे गळ्यात खरखर निर्माण होऊ शकते.  वायरल इंफेक्शन हे गळ्यातील खरखर होण्याचं सर्वसाधारण कारण आहे. यात खोकला येणे, नाकात खाजणे, डायरिया, आवाज बसणे यासारखी लक्षणे दिसतात. 

अनेकदा पोटातील अॅसिड खाण्याच्या नळीपर्यंत येतं. जेव्हा हे असिड गळ्यापर्यंत येते तेव्हा खरखर सुरु होते. गळ्यातील खरखर घरातील काही साध्या उपयांनी कमी केली जाऊ शकते. लसनाची एक पाकळी गाल आणि दातांच्यामध्ये ठेवून चॉकलेटप्रमाणे त्याचा रस शोषल्याने खोकला आणि खरखर पासून आराम मिळू शकतो. 

मोठ्या प्रमाणात गरम द्रव्याचे सेवन करणे, जसे की, मधाचा चहा, तुळसी-लवंग टाकून तयार केलेला काढा, गरम सुप यामुळे गळ्यातील खरखर दूर होऊन आराम मिळू शकतो. अदरक, दालचीनी, लवंग, लीकोरिस यांचे मिश्रण एका ग्लासमध्ये  10 मिनिटांसाठी मिळवून दिवसातून 3 वेळा त्याचे सेवन केल्यास त्वरित आराम मिळू शकतो.

ताप, गिळताना त्रास होणे, श्वास घेताना त्रास होणे, कफ, जड आवाज आणि जर हे सर्व आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीसाठी असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. वरिल लक्षणे अधिक दिवसांसाठी दिसत असल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे  आवश्यक आहे. मात्र, कोरोनासारखी लक्षणे दिसल्यास कोरोना झाला असं समजून घाबरुन जाणेही योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT