Spinach 
health-fitness-wellness

थंडीत पालक खाल्ल्याने होतील हे ५ फायदे, राहाल हेल्दी

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात पालेभाज्या अतिशय छान मिळतात. त्या आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पालक ही हिरव्या भाज्यांमध्ये खाल्ली जाणारी मुख्य भाजी आहे. या ऋतूत पालक खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पालकामध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते. तसेच फायबर भरपूर असते ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

पालकामध्ये असलेले अल्फा लिपोइक ऍसिड, हे अँटिऑक्सिडेंट आहे, यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी सामान्य राहण्यास मदत करते. हिवाळ्यात पालक खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी होतो. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नसते. पालक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, तसेच दृष्टी वाढते. त्यामुळे पालक खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत.

१) पालकात व्हिटॅमिन के असते. त्यामुळे पालक खाऊन हाडांचे आरोग्य सुधारते. त्यात कॅल्शिअम भरपूर असते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्यापासून आपण वाचतो. दुग्धजन्य पदार्थांसाठी तो एक चांगला पर्याय आहे.

२)उच्च रक्तदाब असल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. पण. पालकात तणाव दूर करणारे घटक असतात. त्यामुळे पालक अवश्य खावा.

३) हिवाळ्यात केस गळण्याची समस्या जास्त असते. अशावेळी पालक खाल्ल्याने तुमचे केस मजबूत होतात. पालकात असलेले लोह केसांच्या फॉलिकल आणि लाल रक्तपेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते, त्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात.

४) पालक हिवाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करते. पालकामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

५) पालक पचनक्रिया सुधारते. सकाळी कच्च्या पालकाचा रस प्यायल्याने पचनास मदत होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालक नक्की खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT