health-fitness-wellness

सुरक्षेसाठी घरी राहिल्याने वाढला लठ्ठपणा; मुलांत स्थूलपणा

रेवननाथ गाढवे

निलज बु. (जि. भंडारा) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासन वेळोवेळी लॉकडाउनचा (Lockdown) पर्याय वापरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम (Health effects) होत आहेत. यापैकीच एक म्हणजे स्थूलपणा किंवा मोटापा होय. दीड वर्षात मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढले (The incidence of obesity increased in children) आहे. याचा संबंध भावी काळातील सार्वजनिक आरोग्याशी जुळला आहे. (Staying-at-home-for-safety-increased-obesity)

सुरुवातीला टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिक घरी बसून शासनाच्या नियमांचे पालन करीत होते. नंतर निर्बंधांमध्ये शिथिलता येताच घरातील कामकरी आपापल्या कामावर जायला लागले. परंतु, लहान मुलांचे काय? प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे दोन्ही असतात. कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी शासनाच्या नियमांचे अनुसरण करताना शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे.

टाळेबंदी लागू झाल्यापासून शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवण्या, मैदाने, क्रीडा संकुले सर्व बंद आहेत. त्यामुळे घरी बसून राहण्याखेरीज दुसरा पर्याय मुलांकडे नाही. या सर्वांमुळे मुलांवर दुष्परिणाम होत आहेत. दिवसभर घरात राहून मुलांना टीव्ही किंवा मोबाईलशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. हा पालकांसाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे.

असंतुलित आहार मुलांसाठी घातक

मुले संतुलित आहार घेत नाहीत. जेवल्यानंतर शतपावली करणे तर सर्वच विसरले आहेत. शाळा बंद असल्याने मुलांच्या शरीराचा व्यायामही होत नाही. घरी असल्याने तेल, तूप, व इतर खाद्य पदार्थ ज्यांच्यात स्निग्धता मोठ्या प्रमाणात असते, अशा पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. स्थूलपनामुळे अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मेंदूआघात असे कितीतरी रोग शरीरात प्रवेश करतात.

ग्रामीण भागात लठ्ठपणा कमी

मुलांच्या शरीरातील स्थूलतेचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये अधिक प्रमाणात वाढले आहे. याचे कारण असे की, शाळा बंद झाल्यापासून ग्रामीण भागातील मुले पालकांना शेतीच्या कामात मदत करतात. शेतशिवारात भटकंती करणे, नदीवर पोहणे, धावणे आदी अप्रत्यक्ष व्यायामाची कामे करतात. परंतु, शहरातील मुलांसाठी हे पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे.

शाळा बंद झाल्यापासून मुलांची भाैतिक ॲक्टीव्हिटी कमी झाली आहे. यामुळे ९० टक्के मुलांमध्ये स्थूलपणा वाढला आहे. व्यायाम, कसरत पूर्णपणे बंद झाले असून, जंक फुडचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी त्यांच्याकडून दररोज व्यायाम व कसरत करून घेणे आवश्‍यक आहे.
- डॉ. शशांक क्षीरसागर, बालरोग तज्ज्ञ, भंडारा

(Staying-at-home-for-safety-increased-obesity)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT