Impact Of Breakup On Men esakal
health-fitness-wellness

पुरूषांमध्ये ब्रेकअपनंतर वाढतायत मानसिक समस्या, अभ्यासात स्पष्ट

हा अभ्यास सोशल सायन्सेस अँड मेडिसिन - क्वालिटेटिव्ह रिसर्च इन हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

प्रेमात पडल्यावर अनेकजण एकमेकांच्यात हरवून जातात. दोघांना एकमेकांशी किती बोलू किती नाही असं होऊन जातं. एकमेकांशिवाय करमेनासं होतं. पण काही काळानंतर प्रेमात (Love) असले तरी एकमेकांच्या गोष्टी खुपायला लागतात. कधीतरी सतत एकत्र राहणं आवडणारे दोघं आता एकमेकांपासून दूर राहणं पसंत करतात. दोघांनाही नातं (Relation) तोडावं असं वाटतं. त्यानुसार अनेकजण ब्रेकअप (Breakup) करतात. किंबहूना त्यांच्यासाठी हा निर्णय योग्य असतो.

अभ्यासात काय आढळले?

पण जे पार्टनरबाबत सिरियस असतात त्यांना ब्रेकअप झाल्यावर मानसिक त्रास होतो. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे. एका अभ्यासानुसार ब्रेकअपनंतर पुरूषांमध्ये चिंता, डिप्रेशन आणि आत्महत्येसारखे विचार येण्याचा धोका वाढतो. हा अभ्यास सोशल सायन्सेस अँड मेडिसिन - क्वालिटेटिव्ह रिसर्च इन हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ब्रेकअपनंतर पुरुषांच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो यावर या अभ्यासात संशोधन करण्यात आले होते.

Relationship breakup

ब्रेकअपनंतर ज्या पुरूषांना दुःखी किंवा निराशा वाटते ते राग खेद, दुःख आणि लाज या भावनांना तोंड देण्यासाठी अल्कोहोल पेये, नशा मिळणाऱ्या औषधांकडे वळतात, असेही संशोधनात आढळून आले आहे. कॅनेडियन रिसर्च सेंटर आणि यूबीसी प्रोफेसर ऑफ नर्सिंग, अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जॉन ऑलिफ म्हणाले की, बहुतेक पुरुषांना ब्रेकअप दरम्यान किंवा नाते तुटल्यावर मानसिक आजाराची लक्षणे जाणवली. त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर झाला.

यूबीसीच्या मेन्स हेल्थ रिसर्च प्रोग्राममध्ये (UBC’s Men’s Health Research Program) डॉ. ऑलिफ आणि त्यांच्या टीमने ब्रेकअपनंतर 47 पुरुषांचा अभ्यास केला. त्यांची मुलाखत घेतली. त्यानुसार, ज्या पुरुषांना त्यांच्या नात्यात संघर्ष करावा लागतो त्या पुरूषांना समस्यांविषयी काहीच वाटत नाही. उलट ते समस्येला कमी लेखतात, त्यामुळे नाते आणखी तुटते. त्याच वेळी, या प्रकरणाच्या सकारात्मक पैलूवर केलेल्या संशोधनात ब्रेकअपनंतर, मनस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून पुरूषांनी स्वत:ला बिझी ठेवले. त्यांनी व्यायाम करणे, पुस्तक वाचन आणि स्वत: ची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT