Cold-Cough patients esakal
health-fitness-wellness

वातावरणातील अचानक बदलामुळे जाणवू शकतात 'या' शारिरीक समस्या

सर्दी-खोकल्याकडे फारसे गांर्भीयाने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते.

विजय थोरात

सर्दी-खोकल्याकडे फारसे गांर्भीयाने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते.

सोलापूर : कडाक्‍याची थंडी वाढताच सर्दी-खोकल्याने (Cold-Cough patients) डोके वर काढले आहे. विशेषतः लहान मुले बेजार झाली आहेत. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांर्भीयाने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहुल असू शकते, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

सर्दी, खोकला, कणकणी आल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे या सिझनल अॅलर्जींना (Allergies) वैद्यकीय भाषेत हायनायिटज (Hinanitz) म्हणतात. या आजाराच्या रुग्णांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. याचा नाक, घसा आणि फुप्फुस आणि कान यांच्याशी परस्पर संबंध असल्यामुळे सर्दी, खोकला आणि एखाद्या आजाराची चाहूल देखील असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परंतु, अनेक रुग्ण (Patient) उशिरा येत असल्याने त्यांच्यामध्ये इतर आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. विशेषत: निमोनिया (Pneumonia) आजार दिसून येत आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी आहे व उच्च रक्तदाब (High blood pressure), मधुमेह (Diabetes) किंवा मूत्रपिंड यकृत प्रत्यारोपण झाले आहे अशा रुग्णांनी सर्दी, खोकला व ताप याकडे दुर्लक्ष करू नये, असेही डॉक्‍टरांनी सांगितले.

जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोके वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसल्याने त्यांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. ब्रॉकायिटससारखे फुप्फस (Lungs) आणि श्‍वसननलिकेचे आजारही जडतात. अशावेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा. व्यायाम करावा. लहान बाळांना उबदार कपडे ( Warm clothes)परिधान करावेत.

अशी घ्यावी काळजी

- सर्दी, खोकला हे आजार अंगावर न काढता डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक

- ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी केळी, सीताफळ, पेरु, ऑईस्क्रिम, कोल्ड्रिंक्‍स आणि थंड पेय खाणे टाळावे

- लहान मुले, वयोवृध्द व्यक्‍तींनी उबदार कपडे आवर्जुन वापरावेत

- गर्दी, प्रवासावेळी नियमितपणे मास्क वापरणे आवश्‍यक

थंडी वाढल्यामुळे व्हायरल इन्फेक्‍शनचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्दीची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सर्दीचे रुपांतर कालातरांने दम्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास त्वरित डॉक्‍टरांना दाखवून औषधे घेणे योग्य ठरणार आहे.

- डॉ. नितीन तोष्णीवाल, श्‍वसनरोग तज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT