मॉर्निंग वॉक 
health-fitness-wellness

हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाताय? आजारी पडायचं नसेल तर 'अशी' करा तयारी

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकजण कोणती ना कोणती फिजिकल अॅक्टिव्हिट करतात. काही लोक आपल्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये मॉर्निंक वॉकचा समावेश करतात. जे लोक मॉर्निंग वॉक करण्याला पसंती देतात ते थंडीच्या दिवसातही ही सवय कायम ठेवतात.काही लोक रोज सकाळी रस्त्यावर, किंवा पार्कमध्ये किंवा मोकळ्या जागी सकाळी सकाळी वॉकसाठी जातात, पण थंडीच्या दिवसात असे करणे कित्येकदा त्रासदायक ठरू शकते.

हिवाळ्यात थंड हवेमुळे तुम्हा आजारी पडू शकता. त्याशिवाय सकाळी धुक्यासोबत धुर देखील जास्त असते त्यामुळ ती हवा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असते. थंड हवा आणि विषारी गॅस दोन्ही ह्रदय आणि फुफ्फुसांसंबधीचे आजार वाढवू शकते. ज्यामुळे अस्थमा किंवा सर्दी चा त्रास असतो त्यांनी थंडीच्या दिवसात बाहेर मॉर्निंग वॉकला जाण्याऐवजी घरातीच एक्सरसाईज करणे फायेदशीर ठरू शकते. तरीही तुम्हीला हिवाळ्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जायचे असेल तरी थोडी काळजी घ्या.

थंडीच्या दिवासात आरोग्यासाठी घातक असते हवा आणि धुर

थंडीमध्ये वायू प्रदुषणाची पातळी वाढलेली असते.सुर्योदर्यापुर्वी सगळीकडे चांगल्या धुरकट झालेले असते. सकाळच्या वेळी धुक्यामध्ये हा धुर एकत्र झालेला असतो , त्यामध्ये CO, CO2, SO2,आणि NO2 सारखे विषारी गॅसचे कण उपलब्ध असतात. त्यामुळै ह्रदय, फुफ्फुस, कॅन्सर आणि सीओपीडी सारखे आजार होऊ शकता. थंडीच्या दिवासात मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

हिवाळ्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जायचे असेल तरी थोडी काळजी घ्या.

पहाटे पहाटे मॉर्निंग वॉकला जाऊ नका

हिवाळ्यात मॉर्निंक वॉकला ७ वाजल्यानंतर जाणे फायेदेशीर ठरले. कोवळ्या उन्हात वॉक किंवा एक्सरसाईज केल्यास तुम्हाला जास्त फ्रेश वाटेल आणि तुमच्या आरोग्याला काही नुकसान देखील होणार नाही

उबदार कपडे वापरा

तुम्ही सकाळी वॉकला जाणार असाल तर उबदार कपडे घालून जा. उबदार कपडे वापरल्याने तुमची थंडीपासून सुरक्षा होईल आणि तुमच्या शरीरात उष्णता कायम राहिल.

थंड पाणी पिणे टाळा

सकाळी वॉकला जाऊन आल्यावर गार पाणी अजिबात पिऊ नका. तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर कोमट पाणी प्या. थंड पदार्थ खाणे देखील टाळा.

वयस्कर लोकांची घ्या खास काळजी

वयस्कर लोकांना ११ ते ११.३० वाजल्यानंतर वॉकला जायला पाहिजे. सकाळची थंड हवा आणि विषारी वायूमुळे वयस्कर लोक आजारी पडण्याची शक्यता असते.

अस्थमाच्या रुग्नांनी घ्या काळजी

धुरकट हवेत सतत श्वासोश्वास केल्यास श्वासनिलकेत जळजळ होते, सुज येते आणि फुफ्फुस किंवा छातीत कफ साचण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांना सकाळी सकाळी थंड हवेत जाणे टाळावे.

ब्लड प्रेशर आणि हार्ट अॅटक आणि ऑर्थराईटिस

- थंडीच्या दिवसात ह्दय पेशंटसला घरातून बाहेर जाणे टाळायला हवे

- थंडीच्या दिवासात शरीरात उर्जा टिकून राहण्यासाठी ह्रदयाला जास्त मेहनत करावे लागते. ज्यामुळे ह्रदयाचे आजार असलेल्या रुग्णांना कार्डियत अरेस्ट होण्याचा धोका असतो.

- बीपी आणि आर्थराईटीसच्या रुग्णांना थंडीत सकाळी व्यायम करणे टाळले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी धुर आणि धुके कमी झाल्यानंतर वॉकला बाहेर जायला हवे.

हिवाळ्यात मॉर्निंग वॉकल जाण्याआधी करा तयारी

  • स्कार्फ, ऊनी टोपी, मोजे ग्लव्सचा वापर करा.

  • आरामात वॉक करता येईल असे शुज वापरावे.

  • वॉकसाठी मोकळ्या जागी जाण्याऐवजी पार्कमध्ये जा.

  • रस्त्यावर वॉकला जाऊ नका, धुर आणि धुक्यामध्ये अपघाताचा धोका होऊ शकतो.

  • शरीराचे तापमान निंयत्रित ठेवण्यासाठी वॉक झाल्यावर कोमट पाणी प्या.

  • वॉक सुरू करताना किंवा संपविताना गती हळूवार असावी.

  • पहिल्यांदा वॉकला जात असाल तर १५ मिनिटपेक्षा जास्तवेळ करू नका

  • वॉकनंतर बॅलन्स डाएट घ्या.

  • वॉक करताना हळू हळू श्वास घ्या आणि सकारात्मक विचार करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT