Uri colour for health Team eSakal
health-fitness-wellness

लघवीच्या रंगावरून समजतात आरोग्याच्या समस्या! आताच व्हा सतर्क

तुम्ही किती निरोगी आहात हे तुमच्या लघवीच्या रंगावरून ठरवता येते

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही किती निरोगी आहात हे तुमच्या लघवीच्या रंगावरून ठरवता येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा आरोग्य (Health) तपासण्याचाही एक मार्ग आहे. शरीरात काही समस्या असतील तर लघवीचा रंग बदलतो. रंग, वास या आधारावरून तुम्ही निरोगी आहात कि कोणत्या आजाराने ग्रस्त आहात हे शोधता येते. पुरेशा प्रमाणात पाणी (Water) प्यायल्याने लघवीचा रंग सामान्य राहतो. जर कमी पाणी प्यायले गेले तर साहजिकच लघवीचा (Urine) रंग बदलतो. लघवीचा रंग कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते हे जाणून घेणे गरजचे आहे.

लघवीचा रंग कसा असावा?

तज्ज्ञांच्या मते, लघवीचा मानक रंग हा 'यूरोक्रोम' असून तो किंचित पिवळसर दिसतो. पण, तुमचा आहार, औषधोपचार आणि शरीरातील हायड्रेशन यानुसार त्याचा रंग व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. जर तुम्हाला सतत लघवीच्या रंगात अनपेक्षित बदल दिसत असेल तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. वेगवेगळ्या रंगांच्या आधारे ते समजून घेऊ.

पारदर्शक रंग- जर लघवीचा रंग पारदर्शक असेल तर याचा अर्थ तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घेत आहात. हायड्रेटेड राहणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त पाणी पायल्याने तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. जर कधी कधी लघवीचा रंग पारदर्शक दिसला तर घाबरायची गरज नाही, पण जर तुमच्या लघवीचा रंग नेहमी पारदर्शक दिसत असेल तुम्ही पाणी पिण्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे, अशी सूचना शरीर देते. पारदर्शक लघवीचा रंग हा सिरोसिस आणि व्हायरल हेपेटायटीस यासारख्या यकृत समस्या समस्या असल्यासही दिसतो.

हलका पिवळा ते गडद पिवळा रंग- लघवीचा रंग युरोक्रोम पिगमेंटमुळे हलका पिवळा ते गडद पिवळा दिसतो. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा हे पिगमेंट विरघळते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे युरोक्रोम तयार होतो. काहीवेळा, रक्तातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असल्यामुळे लघवी निऑन रंगात दिसते.

लाल आणि गुलाबी रंग - तुम्ही काय खाल्ले यावर लघवीचा लाल - गुलाबी रंग अवलंबून असतो. पण, प्रोस्टेट, किडनी स्टोन, मूत्राशय किंवा किडनीमध्ये गाठ इ. कारणांमुळेही लघवीचा असा रंग दिसू शकतो. अनेकवेळा जेव्हा तुम्ही गडद लाल आणि गुलाबी रंगाचे पदार्थ खाता तेव्हा लघवीचा तसा रंग येतो.

गडद तपकिरी - अनेकवेळा, मूत्राचा गडद तपकिरी रंग डिहाइड्रेशनचा इशारा देतो. काही वेळा औषधांच्या दुष्परिणामांमुळे लघवीच्या रंग असा दिसू शकतो. गडद तपकिरी रंगाची लघवी यकृताशी संबंधित रोगांची सूचना देते.

हिरवा रंग - लघवीचा निळा आणि हिरवा रंग तुम्ही खाल्ल्याने असू शकतो. मिथिलीन ब्लू नावाचा रंग अनेक कँडीज तसेच काही औषधांमध्ये वापरतात. त्यामुळे तुमच्या लघवीचा रंग निळा दिसू शकतो. पण, या रंगाची लघवी मूत्रपिंड आणि मूत्राशयाशी संबंधित रोग दर्शवतो. स्यूडोमोनास एरुगिनोसा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे तुमचा लघवी निळा, हिरवा किंवा जांभळा रंग दिसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT