Corona-Covid19 
health-fitness-wellness

तुमच्या शरीरात 'ड' जीवनसत्व कमी आहे? तर कोरोनामुळे होऊ शकतो तुमचा मृत्यू

वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर शरीरातील ड जीवनसत्वाचे प्रमाण आणि कोरोना व्हायरस यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याबाबत शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले. 

ड जीवनसत्व आणि श्वसन संक्रमण यांचा परस्पर काही संबंध आहे का याचा अभ्यास संशोधकांनी केला. तेव्हा शरीरात ड जीवनसत्वाचे प्रमाण कमी असेल तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष या संशोधनातून पुढे आला आहे. 

ड जीवनसत्व हे पांढऱ्या पेशांप्रमाणे काम करते. तसेच ड जीवनसत्व हे पांढऱ्या पेशींप्रमाणे सायटोकाइन्स या पेशींना वाढण्यापासून रोखते. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या रुग्णांमध्ये या सायटोकाइन्स पेशींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

इटली आणि स्पेन या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचा वेगवान फैलाव झाला होता. या दोन्ही देशांतील कोरोना परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना एक साम्य आढळून आले आहे. या दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये ड जीवनसत्वाची सरासरी खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण युरोपातील बहुतेक वृद्ध हे सूर्यप्रकाशापासून दूर राहतात. तर उत्तर युरोपमधील लोकांमध्ये ते प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. 

एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ असलेल्या ली स्मिथ यांच्या मते, युरोपीय देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तेथील मृत व्यक्ती आणि ड जीवनसत्व यांच्यात एक संबंध आढळून आला आहे. ड जीवनसत्व श्वसन संक्रमणापासून संरक्षण करते. ज्या व्यक्तींमध्ये ड जीवनसत्वाची कमी होती, त्यांचा मृत्यू झाला आणि यामध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे.

स्मिथच्या मते, या पूर्वीच्या निरीक्षणांमध्ये असे आढळून आले होते की, रुग्णालय आणि केअर होममधील ७५ टक्के लोकांमध्ये ड जीवनसत्वाची तीव्र कमतरता होती. प्रत्येक देशातील रुग्णांची संख्या त्या देशातील चाचण्यांच्या संख्येवर आधारित असते. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक देशाने वेगवेगळे उपाय केले आहेत. त्यामुळे प्रत्येक देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगवेगळी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT