watching TV esakal
health-fitness-wellness

चार तासांपेक्षा जास्त TV पाहताय? रक्त गोठण्याचा धोका

यूकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे

सकाळ वृत्तसेवा

यूकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे

अनेकांना एकाच जागी बसून टीव्ही (TV) पाहण्याची खूप सवय असते. पण तुम्हीही असचं करत असाल तर हे तुमच्या जीवावर बेतू शकते, जास्त वेळ टीव्ही पाहण्याने होणारे नुकसान हे नेहमीच सांगितले जातात, पण आता यूकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, दररोज चार तास किंवा अडीच तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही (TV) पाहिल्याने रक्ताच्या गुठळ्या (Blood Clot) हे 35 टक्के पर्यंत वाढते. ब्रिटेनच्या ब्रिस्टल विद्यापीठाच्या (University of Bristol) संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 1 लाख 31 हजार 421 लोकांचा समावेश करण्यात आला, ज्यांना व्हीटीआयची समस्या नव्हती.

या अभ्यासात टीव्ही पाहणे आणि व्हीटीआय म्हणजे वेनस थ्रोंबेबोलिज्म (venous thromboembolism) यांच्यातील संबंध तपासले गेले. VTI मध्ये पल्मोनरी एम्बोलिझम (pulmonary embolism) (फुफ्फुसातील रक्ताची गुठळी) आणि ब्रेन थ्रोम्बोसिस (Brain Thrombosis) यांचा समावेश होतो. व्हेन थ्रोम्बोसिसमध्ये, शिरामध्ये (Vein) (विशेषत: पायांमध्ये) रक्ताची गुठळी तयार होण्याचा धोका असतो आणि तो फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे पल्मोनरी एम्बोलिझमची शक्यता निर्माण होते.

तज्ञ काय म्हणतात

ब्रिस्टल विद्यापीठातील या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. सेटर कुनुटसोर यांच्या मते, आमच्या अभ्यासाच्या निष्कर्षांनी असेही सुचवले आहे की, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असूनही दीर्घकाळ टीव्ही पाहणे. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका दूर करता येत नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही टीव्ही पाहता तेव्हा मधेच ब्रेक घ्या. अशावेळी अर्धा तास उभे राहून स्ट्रेचिंग करा. टीव्ही पाहताना जंक किंवा फास्ट फूड इत्यादींचे सेवन करू नका.

संशोधकांनी जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्यांमध्ये विकसित होण्याच्या सापेक्ष जोखमीचे विश्लेषण केले. त्यांना असे आढळून आले की जे लोक जास्त वेळ टीव्ही पाहत असतील त्यांना कधीही न पाहिलेल्या लोकांपेक्षा VTE विकसित होण्याची शक्यता 1.35 पट जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT