health-fitness-wellness

वजन वाढण्यासाठी सप्लिमेंट्स घेताय? मग प्रथम हे वाचा

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात वजन वाढविण्यासाठी अनेक जण नानाविध प्रयोग करत असतात. काही जण दररोज वर्कआऊट करतात. त्याचसोबत प्रोटीन शेक किंवा तत्सम पावडरयुक्त पदार्थांचं सेवन करतात. विशेष म्हणजे सप्लिमेंट्स घेतल्यामुळे वजन वाढतं असा दावा अनेक कंपन्या करताना दिसतात. त्यामुळे तरुण मंडळीदेखील या जाहिरातींना भूलुन वेगवेगळं डाएट, प्रोटीन शेक, सप्लिमेंट्स ट्राय करतात. मात्र, अनेकदा या सप्लिमेंट्समुळे काही शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच सप्लिमेंट्स घेतल्यामुळे कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात ते पाहुयात. (weight-gain-what-are-the-side-effects-of-weight-gain-powder)

१. पोटासंबंधीत तक्रारी -

वजन वाढवण्यासाठी सतत प्रोटीन पावडर किंवा तत्सम पावडरचं सेवन केल्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. यात पोटदुखी, पोटात मुरडा येणे, शौचाल न होणे अशा समस्या निर्माण होतात.

२. युरीन स्टोन होण्याची शक्यता -

प्रमाणापेक्षा जास्त सप्लिमेंट्सचं सेवन केल्यामुळे मूतखडा होण्याची शक्यता असते. या पावडरमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं.त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

३. श्वसनासंबंधी तक्रारी -

सप्लिमेंट्सचं सेवन केल्यावर अनेकांना श्वसनासंबंधीत तक्रारी जाणवतात. त्यामुळे अशा तक्रारी जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

४. अतिसार होणे -

अनेक जणांना या सप्लिमेंट्स खाल्ल्यानंतर अॅलर्जी होते. ज्यामुळे पोट बिघडून अतिसार होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

५. यकृताची समस्या -

ज्या व्यक्ती मद्यपान करतात आणि त्याचसोबत वजन वाढण्याच्या पावडरचंही सेवन करतात त्यांना लिवरविषयी समस्या जाणवू शकतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT