Cerebral Palsy Symptoms 
health-fitness-wellness

सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं- उपाय

जन्माच्या वेळी किंवा नंतर काही अडचणी आल्यास सेरेब्रल पाल्सीची समस्या उद्भवू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Cerebral Palsy Symptoms: Microsoftच्या सत्या नाडेलेंच्या मुलाचे झैन नडेला याचे सेरेब्रल पाल्सीमुळे निधन झाले. वयाच्या २६ व्या वर्षी झालेल्या त्याच्या मृत्यूमुळे सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या आजाराची (Health) चर्चा सुरू झाली आहे. सेरेब्रल पाल्सीमुळे शरीराची हालचाल, संतुलन आणि स्नायूंच्या टोनवर परिणाम होतो. 'सेरेब्रल' म्हणजे मेंदूशी संबंधित विकार, आणि 'पाल्सी' म्हणजे कमकुवतपणा किंवा स्नायूंची समस्या. सेरेब्रल पाल्सी मेंदूच्या (Brain) अशा भागात सुरू होते जिथून स्नायू (Muscles) हलविण्याची क्षमता नियंत्रित होते. मेंदूचा भाग पाहिजे तसा विकसित होत नाही किंवा जन्माच्या वेळी किंवा नंतर काही अडचणी आल्यास सेरेब्रल पाल्सीची समस्या उद्भवू शकते. काहीजणांना जन्मजात सेरेब्रल पाल्सी असते. तर काहींना जन्मानंतर (Birth) हा त्रास सुरू होतो. हा आजार काय आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.

Satya nadella son suffer was Cerebral Palsy

सेरेब्रल पाल्सीची कारणे ( (What Causes Cerebral Palsy?)

१) मुलाच्या जन्मादरम्यान गर्भाशयात किंवा नंतर मेंदूमध्ये रक्तस्त्राव

२) महत्वाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह कमी होणे

३) जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर पहिल्या महिन्यात फिट्स येणे

४) अनुवांशिक परिस्थिती

५) मेंदूच्या दुखापती

Cerebral Palsy?

ही आहेत लक्षणे (Symptoms Of Cerebral Palsy?)

प्रत्येक व्यक्तीत सेरेबल पाल्सीची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सेरेब्रल पाल्सीमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. तसच तो शरीराची एक किंवा दोन अंग, किंवा शरीराच्या एका बाजूवर परिणाम करू शकतो. हालचाली आणि समन्वयात अडथळा, बोलणे, खाण्याच्या समस्या अशी लक्षणे असतात.

येतात या अडचणी

स्नायूंमध्ये ताठरपणा येणे होणे हे महत्वाचे लक्षण आहे, धक्का किंवा धक्कादायक अनैच्छिक हालचाली होणे, मंद हालचाली होणे, तसेच चालताना अडचणी येणे, एका हातानेच काम करता येणे, कपड्यांचे बटण लावण्यात अडचणी येणे.

सेरेब्रल पाल्सी कसा टाळता येईल? (How To Prevent Cerebral Palsy?)

सेरेब्रल पाल्सी टाळता येत नाहीत, पण, त्याचा धोका कमी करू शकतो. जर गर्भवती असाल किंवा गर्भधारणेसाठी योजना करत असाल, तर तुम्ही निरोगी राहण्यासाठी आणि गर्भधारणेची गुंतागुंत कमी करण्यासाठी काही पावले उचलू शकता:

१) तुम्ही लसीकरण झाले आहे का त्याची खात्री करा. रुबेला सारख्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी लस घेतल्याने गर्भाच्या मेंदूला हानी पोहोचवणारा संसर्ग टाळता येतो.

२) तुम्ही जितके निरोगी राहाल तितका तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका कमी असते. गर्भधारणेदरम्यान असे निरोगी असणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे सेरेबल पाल्सी होण्यापासून वाचता येऊ शकते. तुम्ही जितके निरोगी गर्भधारणेकडे जात आहात, तितकेच तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते ज्यामुळे सेरेब्रल पाल्सी होते.

३) गरोदरपणात डॉक्टरांना नियमित भेट देणे हा तुमच्यासाठी आणि बाळाच्या आरोग्याची जोखीम कमी करण्यासाठी चांगला मार्ग आहे.

४) दारू, तंबाखू आणि बेकायदेशीर औषधे घेणे टाळा. यामुळे सेरेबल पाल्सीची जोखीम वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT