Difference Between Cardiac Arrest And Heart Attack
Difference Between Cardiac Arrest And Heart Attack 
health-fitness-wellness

हार्ट अटॅक - कार्डियाक अरेस्ट मध्ये नेमका फरक कोणता?

सकाळ डिजिटल टीम

आजकाल अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पण अनेकदा असं होतं की आपण एक आजार मानतो तो काहीवेळा दुसराच असू शकतो. त्याचप्रमाणे हार्ट अटॅक (Heart Attack) आणि कार्डियाक अरेस्टमध्येही (Cardiac Arrest) लोक खूप गोंधळलेले असतात. त्यांना या दोघांमधला फरक नेमका लक्षात येत नाही. पण या दोघांची लक्षणे (Symptoms) खूप वेगळी आहेत. त्यामुळे या दोघांमधला फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. हा फरक लक्षात आल्यावर व्यक्ती जगण्याची शक्यता खूप जास्त असते. (Difference Between Cardiac Arrest And Heart Attack)

Blood Pressure

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?

कार्डियाक अरेस्ट असताना हृदय शरीरात रक्त पंप करणे अचानक थांबवते. जेव्हा हृदय रक्त पंप करणे थांबवते, तेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळणे बंद होते.त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊन तो बेशुद्ध होतो.

हार्ट अटॅक म्हणजे काय?

हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा धमनीमध्ये अचानक अडथळा येतो. हृदयात रक्तप्रवाह प्रतिबंधित होतो. हा अडथळा मुख्यत: कोरोनरी धमन्यांमुळे प्लेक तयार झाल्यांमुळे होतो. जेव्हा रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा रक्तप्रवाह पूर्णपणे प्रतिबंधित होतो.

Chest pain

कार्डियाक अरेस्टची लक्षणे

कार्डियाक अरेस्ट अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यात हृदयविकाराचा झटका हा अगदी सामान्य आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे रुग्ण अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडचो. झटका येण्यापूर्वी छातीत हलके दुखणे, धाप लागणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे अशी काही लक्षणे दिसतात.

हार्ट अटॅकची लक्षणे

हार्ट अटॅक अचानक येत असला तरी त्याची लक्षणे आधीच दिसायला लागतात. याकडे कधी दुर्लक्ष करू नका. सुरुवातीला आधी चक्कर यायला लागते. त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होतो. डावा हात दूखतो, हाता-पायाला सूज येते. जडपणा, वेदना, मळमळ, अपचन, ओटीपोटात दुखणे, धाप लागणे, थंड घाम येणे, थकवा आणि चक्कर येणे यांचा समावेश होतो.

Heart Attack

कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅक प्रमाणे असतो का?

कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक दोन्ही एकसारखे दिसतात. पण हे दोन्ही खूप वेगळे आहेत. हृदयविकाराचा झटका, ज्याला मायोकार्डियल इन्फ्रक्शन म्हणतात. झटका आल्यावर हृदयात रक्त प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होतो. जेव्हा हृदयाच्या एखाद्या भागामध्ये रक्तप्रवाह कमी होतो किंवा नसतो तेव्हा इन्फ्रक्शन होते. म्हणजेच हृदयाचे काम सुरू असले तरी ते सक्षमपणे काम करत नसते. तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक धडकणे बंद होते. सहसा हे हृदयाच्या 'विद्युत' प्रणालीतील समस्येमुळे होते. हृदयाची धडधड थांबताच मेंदूसह संपूर्ण शरीरात रक्त वाहत नाही. त्यामुळे समस्या वाढते.

heart

तुमचा जीव वाचेल का?

या दोन्ही प्रकारात जीव वाचण्याची शक्यता वेगवेगळी असते. रूग्णालयात पोहोचू न शकणाऱ्या ९० लोकांचा मृत्यू हा कार्डियाक अरेस्टची समस्या असल्याने होतो. कार्डियाक अरेस्ट येण्याच्या काही मिनिटे आधी सीपीआर केला तर जगण्याची शक्यता दोन ते तीन टक्के वाढते. तर, हृदयविकाराचा झटका मात्र थोडा कमी तीव्र असतो. कारण त्यात ब्लॉक केलेली धमनी योग्य उपचाराने लवकर उघडता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेच्या भीतीने काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणं टाळलं - अमित शाह

SCROLL FOR NEXT