which foods should eat on late night nagpur news 
health-fitness-wellness

तुम्हालाही रात्री उशिरापर्यंत जागायची सवय आहे? मग चुकूनही खाऊ नका 'हे' खाद्यपदार्थ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागायची सवय असेल किंवा तुमचे ऑफीस रात्री उशिरापर्यंत असेल तर अशावेळी खाद्यपदार्थ खाताना काळजी घ्यायला हवी. असे काही खाद्यपदार्थ आहेत जे रात्री खाल्ल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वजन वाढणे, अ‌ॅसिडिटी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. मग चला तर पाहुयात रात्री खायला कोणते खाद्यपदार्थ  खायला पाहिजे आणि कोणते नाही.
हे खाद्यपदार्थ असतात हेल्दी -

पॉपकॉर्न : 
पॉपकॉर्नमध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच यालाा पूर्णअन्न देखील म्हटले जाते. यामध्ये फायबरची मात्रा देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर पॉपकॉर्न खाल्ल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळेल.

ओटमील -
ओटमीलमध्ये देखील फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच थोडेसे ओटमील खाल्ल्याने पोटदेखील लवकर भरते. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.

हर्बल चहा -
रात्री काम केल्यानंतरही तुम्हाला झोप येत नसेल तर हर्बल चहा उपयुक्त ठरेल. मात्र, या हर्बल चहा पावडरमध्ये कॅफीन नसावे याची काळजी घ्यायला पाहिजे.

लो-शुगर ग्रेनोला बार -
तुम्हाला कुकी आणि डोनट खायचे मन करत असेल तर ग्रैनोला बार हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. तसेच रात्री तुम्ही बाहेर फिरायला जायचं असेल तर ते डब्ब्यावरही घेऊन जाऊ शकता.

ग्रीक योगर्ट -
रात्री जागताना तुम्ही घरी बनविलेले दही देखील खाऊ शकता. यामुळे शरीरातील कॅल्शियमची मात्रा प्रमाणात राहील. तसेच तुम्हाला शांतात वाटेल.

हे खाद्यपदार्थ खाऊ नये -
तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर खाद्यपदार्थांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये खालील पदार्थांचा समावेश होतो.

पिझ्झा -
पिझ्झामध्ये ग्रीस असल्याने छातीत जळजळ होऊ शकते. तसेच पिझ्झा किती हेल्दी असतो हे सांगायची गरज नाही. त्यामुळे पिझ्झा खाणे टाळायला पाहिजे.

कॉर्नफ्लेक्स किंवा साखर असलेले खाद्यपदार्थ -
अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे अर्ध्या रात्री भूक लागली असेल तर अनेकजण असे पदार्थ खाण्याला पसंती देतात. मात्र, हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

चॉकलेट आणि बिस्कीट -
अनेकजण रात्री खाण्यासाठी या पदार्थांना पसंती देतात. मात्र, तुम्हाला याच पदार्थांपासून दूर राहायचे आहे. तुम्ही हे पदार्थ खाल्ल्यास तुमचे वजन वाढण्याचा धोका असतो.

आइसक्रिम -
आइसक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते आणि तुम्ही रात्रीला काम करायचे असेल आइसक्रीम खाणे उपयुक्त ठरणार नाही.

चिप्स - यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. त्यामुळे चिप्स रात्री खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असते. 

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT