फक्त या पाचच कारणांमुळे येतात चेहऱ्यावर पिंपल्स!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

हवामान बदलल्यामुळे त्वचेवर अनेक समस्या उद्भवतात. थंड हवामानात त्वचेवर डाग पडतात. याशिवाय हिवाळ्यामध्ये लालसरपणा, खाज सुटणे, ज्वलन होण्याची समस्या आहे. काही महिलांना थंड हवामानात चेहऱ्यावर मुरुम येतात.

हवामान बदलल्यामुळे त्वचेवर अनेक समस्या उद्भवतात. थंड हवामानात त्वचेवर डाग पडतात. याशिवाय हिवाळ्यामध्ये लालसरपणा, खाज सुटणे, ज्वलन होण्याची समस्या आहे. काही महिलांना थंड हवामानात चेहऱ्यावर मुरुम येतात.

जेव्हा तुम्हाला एखाद्या अडचणीवर उपचार हवा असतो तेव्हा त्याची नक्की कारणं काय आहेत आणि तुम्ही कोणता उपचार निवडायला हवा हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः तुमचं उत्तर बऱ्याच प्रश्नांसाठी एकच असेल तेव्हा. तुम्ही नीट आहार घेत नसाल किंवा तुमचं शरीर हार्मोनल बदलामधून सध्या जात असेल वा तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन वापरत नसाल यापैकी काहीही कारण असू शकतं.

ही आहेत प्रमुख कारणं

 • तारुण्यावस्था
 • प्रदूषण
 • खाण्याच्या चुकीच्या सवयी
 • हार्मोन्सचे असमोतल
 • तणाव

पिंपल्स होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण पिंपल्समुळे नेहमीसाठी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो.

जाणुन घ्या घरगुती उपाय..

 • पिंपल्स कमी करण्यासाठी सर्वातआधी तर तुम्हाला तेलकट खाणे टाळले पाहिजे.
 • त्यासोबतच रात्री जास्त जागरण करु नका. वेळेवर झोपण्याची सवय लावा. अधिक प्रमाणात पाणी प्या. याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडलीत.
 • पिंपल्स दूर करण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय मध सुद्धा मानला जातो. पिंपल्सवर मध 30 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. याने पिंपल्सपासून सुटका मिळेल.
 • चेहऱ्याच्या ज्या भागावर पिंपल्स झाले आहेत त्या भागावर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. पिंपल्स लगेच दूर होतील.
 • सफरचंद आरोग्यासाठी अनेक बाबतीने फायद्याचं आहे. सफरचंदाचं साल पिंपल्सवर लावल्यास आराम मिळतो.
 • पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी अंडही फार उपयोगी आहे. अंड्याचा पांढरा भाग मधात मिश्रित करुन चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. याने पिंपल्सपासून आराम मिळेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news There are only five reasons why pimples appear on the face