बहुतेक लोक जेव्हा दैनंदिन कामे करतात तेव्हा उजव्या हाताचा वापर करतात.
बहुतेक लोक जेव्हा दैनंदिन कामे करतात तेव्हा उजव्या हाताचा वापर करतात. मात्र, हा एक मानवी स्वभाव (Human Nature) आहे, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. यामागे एक साधं विज्ञान आहे. आकडेवारीनुसार जगातील 90 टक्के लोक लेखन करताना उजव्या हाताचा वापर करतात. त्यामागे दोन कारणे आहेत, एक आपला मेंदू आणि दुसरा आपला DNA. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
आपल्या मेंदूचा डावा भाग आपल्या शरीराचा उजवा भाग आणि अंग नियंत्रित (Control)करतो आणि आपल्या मेंदूचा उजवा भाग आपल्या शरीराचा डावा भाग आणि अवयव नियंत्रित करतो, हे पुस्तकांमध्ये जवळजवळ प्रत्येकाने वाचले असावे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, जेव्हा जेव्हा आपण कोणतीही नवीन भाषा बोलायला किंवा लिहायला शिकतो, तेव्हा तेव्हा त्या परिस्थितीत आपल्या मेंदूचा डावा भाग खूप वापरला जातो.
बहुतेक लोक उजव्या हाताने लिहिण्याचे कारण-
आपल्या मेंदूचं पहिलं प्राधान्य काम हे आहे की कमीत कमी ऊर्जा खर्च करून जास्तीत जास्त काम करणं. बहुतेक लोकांच्या मनात ऊर्जा व्यवस्थापनाची (Energy Management)कला असते. डाव्या हाताने (Left Hand) लिहिण्याच्या बाबतीत जर आपला मेंदू सर्व भाषेच्या माहितीवर प्रक्रिया करून तो उजव्या (Right) भागाच्या मेंदूकडे ट्रान्सफर करत असेल आणि मग उजव्या बाजूच्या मेंदूला आपला डावा हात लिहिण्यासाठी आदेश देतो, तर या संपूर्ण प्रक्रियेस अतिरिक्त ऊर्जा आणि वेळ लागतो. हीच अतिरिक्त ऊर्जा आणि वेळ वाचवण्यासाठी बहुतेक परिस्थितींमध्ये आपला मेंदू अप्रत्यक्षपणे आपल्याला थेट (Indirectly)हाताने लिहिण्यास भाग पाडतो.
काही लोक डाव्या हाताने लिहितात त्याचे कराण-
Scientific Americanच्या एका अहवालानुसार, उर्वरित लोकांपैकी सुमारे 10 टक्के लोक लिहिताना डाव्या हाताचा वापर करतात. खरं तर, बालपणात, बरेच लोक त्यांच्या मेंदूमध्ये उर्जा व्यवस्थापनाचे (Energy Management) पॅटर्न विकसित करत नाहीत. यामुळे त्याचं मन त्याला कधीही उजव्या हाताने लिहिण्याची सक्ती करत नाही. असे लोक बहुतेक कामं डाव्या हाताने करतात, किंवा कोणत्याही हाताने काहीही करू शकतात. त्यांना कोणत्याही एका हाताचा वापर करणे बंधनकारक नाही.
डावा हात किंवा उजवा हात असण्यात डीएनएचे योगदान
अमेरिकेत 2012 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, हे अगदी स्पष्ट झाले आहे की जर एखाद्या मुलाचे पालक दोघेही उजव्या हाताने लिहिणारे असतील तर ते मूल डावखुरे असण्याची शक्यता केवळ 9 टक्के असते आणि पालकांपैकी एक डावखुरा आणि दुसरा उजव्या हाताचा असेल तर संभाव्यता 19 टक्क्यांपर्यंत वाढते. याव्यतिरिक्त, जर आई-वडील दोघेही डावखुरे असतील तर मूल डावखुरे असण्याची शक्यता 26 टक्के होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.