pregnancy  esakal
health-fitness-wellness

PCODमुळे गर्भधारणा का होत नाही? जाणून घ्या कारणे

अनेक महिलांना जीवनशैलीतील बदलांमुळे सध्या हा त्रास होत आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्या अनेक महिलांना जीवनशैलीतील बदलांमुळे पीसीओडी (PCOD) चा त्रास होत आहे.असा त्रास होत असेल तर महिलांना पाळी वेळेवर न येणे, शरीरावर अतिरिक्त केसांची वाढ, वजन वाढणे अशा समस्या महिलांना येतात. या समस्या निर्माण झाल्यावर महिला डॉक्टरकडे गेल्या की त्यांना पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज समस्या असल्याचे निदान डॉक्टर करतात. यामुळे महिलांना विविध समस्यांना जावे लागेल.

साधारणपणे १२ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) ही हार्मोनल समस्या आढळते. हार्मोन्समध्ये (Harmons) जेव्हा असंतुलन होतं तेव्हा पीसीओडीची समस्या दिसायला लागते. या समस्येमुळे अंडाशयाचा आकार खूप मोठा होता आणि त्यात सिस्ट तयार होतात. याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना नरूला म्हणाल्या, की पीसीओडीच्या लक्षणांमध्ये पाळी अनियमित येणे, शरीरातील केसांची जास्त वाढ होणे, केस गळणे, पुरळ आणि वजन वाढणे यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत गरोदरपणात खूप त्रास होतो. कारण त्यावेळी स्त्रीचे ओवेल्यूशन नीट होत नाही. त्यामुळे गर्भधारणा होत नाही. अशावेळी वेळीच लक्षणे ओळखून त्त्वरीत उपचार सुरू करणे फायद्याचे ठरते.

periods

या गोष्टी कारणीभूत

स्त्रीचे अंडाशय फीमेल सेक्‍स हॉर्मोन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन तयार करतं. अंडाशय काही प्रमाणात मेल सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन तयार करतात. पण, ज्या महिलेला PCOD असतो तेव्हा अंडाशय इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनऐवजी इतर मेल हार्मोन एंड्रोजन तयार करण्यास सुरवात करतात. याला हायपरअँड्रोजेनिझम म्हणतात.या समस्येमुळे ओवेल्युशन होत नाही आणि मासिक पाळी अनियमित येते. 50% मुलींमध्ये PCOD ची समस्या दिसून येते. तसेच ही अनुवांशिक समस्या आहे.

treatment

पीसीओडीवर उपचार आवश्यक (Treatment)

पीसीओडीवर आयुर्वेदिक, हॉमिओपेथिक अशा पॅथींच्या उपचार पद्धती आहेत. तुमच्या प्रकृतीला कोणते औषध मानवते, त्यावरून तुम्ही योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. पण डॉक्टरांकडूनच औषध घेणे मह्त्वाचे आहे. अशा गोष्टींसाठी गुगलचा आधार घेऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT