corona vaccine sakal media
health-fitness-wellness

कोरोना प्रतिबंधक लशीमुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या?

ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील आणि अमेरिकेतील संशोधनाच्या पथकाने याबाबत संशोधन केलयं.

सकाऴ वृत्तसेवा

ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील आणि अमेरिकेतील संशोधनाच्या पथकाने याबाबत संशोधन केलयं.

कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनकाची लस (The Oxford AstraZeneca vaccine) ही प्रभावी ठरलीय. परंतु लशीचा वापर केल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम (Side effects) समोर आले आहेत. यामध्ये आता लस घेतल्यानंतरही रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) तयार होत असल्याचे तक्रारीही समोर आलेले आहेत. अशा तक्रारीमुळे काही देशांनी लशीचा वापर थांबवण्यात आला होता. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) का होतात? याबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून त्यातील निष्कर्ष (Conclusion) समोर आलेले आहेत.

ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील आणि अमेरिकेतील संशोधनाच्या पथकाने याबाबत संशोधन केलयं. रक्तातील प्रथिने लशीच्या मुख्य घटकांकडे कशा पद्धतीने ओढले जाते, याबाबत संशोधकानी काही मुद्दे मांडले आहेत. अ‍ॅस्ट्राझेनकाची लस (AstraZeneca vaccine) घेतल्यानंतर साखळी तयार व्हायला सुरवात होते. यात रोगप्रतिकारशक्तीचाही समावेश असतो. या प्रक्रियेमधून रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) तयार होऊ शकतील, असा दावा संशोधकांनी केला आहे. अ‍ॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे अनेकांचे कोरोनापासून संरक्षण झाले. भारतामध्ये कोरोनाची ही लस सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केली असून 'कोविशिल्ड' या नावाने दिली जाते. या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) तयार होत असल्याचे समोर आल्यानंतर भारतातही चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे एकूणच जगभरामध्ये अ‍ॅस्ट्राझेनकाची लस घेतलेल्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) तयार झाल्याच्या प्रकरणांची संख्या जास्त आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनकाची लस (The Oxford AstraZeneca vaccine) घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात? हे दुष्परिणाम थांबवता येऊ शकतात का? याबाबत संशोधन करण्यात आले आहे. ब्रिटन सरकारने कार्डिफमधील संशोधकांना आपत्कालीन निधीदेखील पुरवला असून या संशोधकांनी काही प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले. तर अ‍ॅस्ट्राझेनकाचे शास्त्रज्ञ देखील या संशोधनात सहभागी झाले. लसीपेक्षा कोविड संसर्गामुळे गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते आणि ते का होतात, याचे संपूर्ण स्पष्टीकरण अद्याप समोर आले नसल्याचे अ‍ॅस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्यांनी म्हटलयं. ही लस स्नायूमध्ये टोचवली जाते, परंतु काही कालावधीत रक्तप्रवाहात लस जाते. तेथे लस ही रक्तातील पेशी फॅक्टरमध्ये चारमध्ये प्रथिनांना आकर्षित करु शकतात. हे संशोधन विज्ञान विषयक नियतकालिक (Science Advances) मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

या संशोधनानुसार लशीतील एडिनोव्हायरस ही प्लेटलेट चार प्रथिनांना एखाद्या चुंबकासारखे आकर्षित करत असते. कार्डिफ विद्यापीठातील (Cardiff University) संशोधक प्रा. अ‍ॅलन पार्कर (Alan Parker) यांनी 'बीबीसी'ला सांगितले आहे की, एडिनोव्हायरसचा (Adenoviruses) पृष्ठभाग अत्यंत नेगिटिव्ह (Negative) आहे आणि प्लेटलेट फॅक्टर (Platelet factor) चार अत्यंत पॉझिटिव्ह (Positive)आहे आणि या दोनीही गोष्टी अगदी चांगल्या प्रकारे जुळतात. या संशोधनात आणखी काही टप्पे गाठायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणे

- ज्या व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारचे आजार आहेत, अशा व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण अधिक असते.

- ज्या व्यक्तींची शारीरिक हालचाल कमी असते.

- एखादी दुखापत झाली असल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यास अशा व्यक्तींमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

- काही रोग असल्यास रक्ताची गुठळ्या होऊ शकतात. शरीराच्या खोल नसामध्ये रक्त गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

रक्ताच्या गुठळ्या होण्याची लक्षणे

- सूज

- तीव्र वेदना

- कळ येणे

- शरीराच्या काही भागांना अर्धांगवायू होणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT