Urination
Urination Team eSakal
health-fitness-wellness

World Kidney Day 2022: तुम्ही दिवसातून ७-८ वेळा लघवीला जाता ? असू शकतात ही लक्षणे

सकाळ डिजिटल टीम

World Kidney Day 2022: दरवर्षी १० मार्चला जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. या काळात लोकं किडनीच्या समस्यांविषयी जागरूक होतात. किडनी आणि लघवीचा एकमेकांशी संबंध आहे. जेव्हा एखादी व्यक्ती भरपूर पाणी (Water) पिते तेव्हा त्याला वारंवार लघवी होण्याची समस्या येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त लघवी होत असेल तर त्यामागे काही सामान्य आणि काही गंभीर कारणे असू शकतात. सारखी सारखी लघवी होणे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे वारंवार लघवी येण्याची समस्या का निर्माण होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

ही आहेत कारणे

१) जेव्हा व्यक्तीच्या मुत्राशयातील स्नायू (Bladder Muscle Sensitive) आवश्यकतेपेक्षा जास्त संवेदनशील होतात तेव्हा ही समस्या निर्माण होते. या समस्येदरम्यान मूत्राशय ओव्हरएक्टिव्ह (OAB) होते. कॉफी, हॉट चॉकलेट यांत कॅफीन असते. ही पेये जास्त प्यायल्याने वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते. मूत्राशयात संसर्ग झाला तरीही ही समस्या निर्माण होते.

२) ब्रेन स्ट्रोक हेही यापाठचे कारण असू शकते. जेव्हा ब्रेन स्ट्रोक होतो तेव्हा मूत्राशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा खराब होतात. त्यामुळे व्यक्ती लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना वारंवार लघवी होते.

३) महिलांना योनीमार्गात समस्या निर्माण होते तेव्हा सारखी सारखी लघवीला लागते. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा व्यक्तीला त्याचे मूत्राशय भरलेले जाणवते. तसेच खाज येणे, सूज येणे आणि जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.

४) पेल्विक स्नायू कमकुवत झाले तरीही वारंवार लघवी होऊ शकते. स्नायू कमकुवत असल्यास एखाद्या व्यक्तीची लघवी लीक( गळू) होऊ शकते.

५) UTI ची समस्या असल्यास, वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते.

हे लक्षात ठेवा

- आरोग्यसंपन्न माणसाला एका दिवसात ८०० ते २००० ml लघवी होते. तसेच ६ ते ७ वेळा लघवी होणे सामान्य आहे.

- जर एखाद्या व्यक्तीला रात्री दोन-तीन वेळा लघवी होत असेल तर ही नॅक्टुरियाच्या (nocturia) समस्येची लक्षणे असू शकतात.

3 लिटरपेक्षा जास्त लघवी करणाऱ्यांना Diabetes insipidus समस्या असू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT