World Oral Health Day 2022 Sakal
health-fitness-wellness

World Oral Health Day 2022: ब्रश- फ्लॉस करण्याची योग्य पद्धत कोणती?

तोंडाचे आरोग्य जपणे खूप महत्वाचे असल्याची जाणीव हा दिवस आपल्याला करून देतो.

सकाळ डिजिटल टीम

दातांचे आरोग्य चांगले राखणे सर्वात गरजेचे असते. त्यासाठी नियमित दात घासणे, भरपूर चुळ भरणे, नियमित दातांची तपासणी करणे गरजेचे असते. दरवर्षी २० मार्चला जागतिक मौखिक आरोग्य दिन( World Oral Health Day) साजरा केला जातो. तोंडाचे आरोग्य जपणे खूप महत्वाचे असल्याची जाणीव हा दिवस आपल्याला करून देतो. तोंडी आरोग्याचा अर्थ फक्त स्वच्छ दात - हिरड्या स्वच्छ असाव्यात असा होत नाही. दात हे तुमच्या एकूण आरोग्यावर, जीवनाच्या गुणवत्तेवरही परिणाम करतात. त्यामुळे दातांचे आरोग्य महत्वाचे ठरते. त्यासाठी लोकं नियमित विविध उपाय करतात.

brush the teeth

ब्रश करण्याच्या टिप्स

-दात स्वच्छ राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करणे गरजेचे आहे.

- नेहमी फ्लोराईट टूथपेस्ट वापरणे योग्य ठरते

- रोज योग्य पद्धतीने दात घासण्यासाठी दोन मिनिटं हलक्या हाताने ब्रश करणे फायद्याचे ठरते.

- टूथब्रशने ४५-अंशाच्या कोनात हळू हळू दात घासा.

- दात आतून बाहेरून हळूहळू साफ करा.

- पाठच्या दातांना योग्यप्रकारे साफ करण्यास विसरू नका

- पुढच्या दातांना आतल्या बाजूने व्यवस्थित साफ करा

फ्लॉस करण्याच्या टिप्स

- डेंटल प्लेक टाळण्यासाठी, दिवसातून एकदा दातांमध्ये फ्लॉस करा

- योग्य ग्रिप मिळण्यासाठी १२ ते १८ इंचाचा फ्लॉस वापरा. तो तुमच्या बोटांभोवती गुंडाळा. त्यानंतर फ्लॉसला प्रत्येक दाताच्या बाजूने वर आणि खाली हलवा. यामुळे दातातील प्लेक, बॅक्टेरिया आणि अन्न काढून टाकले जाईल.

- फ्लॉसला अशाप्रकारे दातांवरून वळवा कि तो तुमच्या हिरडीपर्यंत जाऊन तेथेही साफ करता येईळ. त्यासाठी तोंडातच सी आकार तयार करा

- पाठचे दातही फ्लॉस करा

माऊथवॉश वापरण्याच्या टिप्स

- तुम्ही फ्लोराईड टुथपेस्टना दात घासत असाल तर ब्रश केल्यानंतर लगेच माऊथवॉश वापरू नका. कारण असे केल्याने आधीचे फ्लोराईड निघून जाण्याचा धोका असतो.

- फ्लोराईडयुक्त माऊथवॉश वापरल्याने दात किडणे कमी होऊ शकते.

- फ्लोराईडयुक्त माऊथवॉश वापरल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ-पिऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT