How Liver Hormones Affect Appetite and Sleep: आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, अन्न योग्यरित्या पचवणे, शरीरात साखर साठवणे तसेहच इतर महत्त्वाची कामे यकृत करते. यकृत व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचे परिणाम आपल्या आरोग्यवर दिसू लागतात.
थकल्यासारखे वाटणे, भूक न लागणे अशी सामान्य वाटणारी लक्षणे देखील कधी कधी गंभीर आजाराचे संकेत देऊ शकतात. अशीच यकृत खराब झाल्याची ठराविक लक्षणे रात्री जाणवतात, ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण ती वेळीच ओळखणे गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया, यकृत खराब होण्याची रात्री दिसणारी लक्षणे कोणती...
- यकृत खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. हेपाटाइटिस (व्हायरल इन्फेकशन, मद्यपान किंवा ऑटोइम्युन आजार) हे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे यकृताला सूज येते.
- त्याचप्रमाणे, टायलिनॉल (पॅरासिटामॉल) सारखी औषधे जर अति प्रमाणात घेतली गेली, तर ती यकृतावर घातक परिणाम करू शकतात.
- विल्सन डिसीज ही एक आनुवंशिक स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात तांब्याचं (Copper) प्रमाण जास्त होते आणि त्यामुळे यकृत खराब होते.
- लिव्हर कॅन्सर हा आणखी एक गंभीर कारण आहे, जो यकृताची कार्यक्षमता कमी करतो. तसेच, सिरोसिसमध्ये यकृता मध्ये व्रण तयार होतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह आणि यकृताचे काम दोन्ही बाधित होतात.
यकृत निकामी होऊ लागल्यावर घ्रेलिन नावाचे हार्मोन, जे भूक वाढवते ते कमी प्रमाणात तयार होते आणि लेप्टीन ज्या हार्मोनमुळे भूक कमी होते ते जास्त प्रमाणात तयार होते. यकृताचे काम बिघडले की पचनक्रिया मंदावते आणि रक्तात विषारी घटक वाढतात. त्यामुळे मळमळ जाणवते आणि परिणामी भूक कमी होते.
नीट झोप लागण्यासाठी मेलाटोनिन आणि ग्लुकोज गरजेचे असतात. यकृत खराब झाल्यावर हे हार्मोन्स योग्यरित्या काम करत नाहीत. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही किंवा झोप लागल्यावर वारंवार जाग येते.
रात्री झोपताना पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज जाणवणे हे ‘अॅसायटिस’ नावाच्या स्थितीचे लक्षण असू शकते, जी लिव्हर सिरोसिसमुळे होते. सिरोसिस म्हणजे यकृतात होणारे दीर्घकालीन व्रण आणि यकृत खराब होणे, जे दीर्घकाळ मद्यपान, हेपाटाइटिस किंवा फॅटी लिव्हरमुळे होऊ शकते.
‘प्रायमरी बायिलिअरी कोलांजायटिस’ हा एक आजार आहे ज्यामध्ये यकृताच्या नळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे डोळे आणि तोंड खूप कोरडे पडतात. हा आजार अनेक वेळा ‘स्जोग्रेन सिंड्रोम’ नावाच्या दुसऱ्या ऑटोइम्युन आजारासोबतही दिसतो.
रात्री झोपताना किंवा झोपले असताना अंगाला खाज सुटणे हे यकृत खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे. ही खाज प्रामुख्याने हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवर किंवा शरीराच्या इतर भागांवर जाणवू शकते. ही समस्या वारंवार होत असले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.