acidity symptoms and causes esakal
आरोग्य

Acidity Pain : ॲसिडिटी कशामुळे होते? सततच्या ॲसिडिटीवर औषधे नको तर या मसाल्याचे करा सेवन!

Acidity symptoms: ओव्याच्या मदतीने तुम्ही पोटातील गॅस वेगाने काढून टाकू शकता

Pooja Karande-Kadam

Acidity Pain : जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी असे म्हणतात. सामान्यत: आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो. जो अन्न पचवण्याचे व ते तोडण्याचे कार्य करतो.

एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ होणे अशी लक्षणे दिसून येतात.

आजकाल लोक पोटाच्या अनेक समस्यांशी झगडताना दिसतात. वास्तविक, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक पोटाशी संबंधित समस्यांना बळी पडत आहेत.

त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे गॅसचा बळी पडणे. जर तुमच्या पोटात लवकर गॅस तयार होऊ लागला तर पोट फुगते आणि आंबट चवीने पोटातून दुर्गंधीयुक्त हवा बाहेर पडू लागते.

ही गोष्ट खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि खराब जीवनशैली यामुळे ॲसिडिटी होते. त्याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या किंवा अति तेलकट व तिखट पदार्थ खाणाऱ्यानाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काही औषधांनी ॲसिडिटीचा कमी होऊ शकतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

ॲसिडिटीमुळे लोकांना शांत झोप लागत नाही. त्यांची प्रकृती बिघडते . अशावेळी या गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय करून पाहू शकता.

स्वयंपाकघरात मिळणाऱ्या जिरे आणि ओव्याच्या मदतीने तुम्ही पोटातील गॅस वेगाने काढून टाकू शकता. याची पावडर तुम्ही घरी कशी बनवू शकता हे आम्ही तुम्हाला सांगतो.

काय आहेत ॲसिडिटीची लक्षणे ? (Acidity Symptoms)

– पोटात जळजळ होणे

– घशात जळजळणे

– अस्वस्थ वाटणे

– आंबट ढेकर येत राहणे

– तोंडाची चव जाणे

– बद्धोष्ठतेचा त्रास होणे.

कशामुळे होतो ॲसिडिटी ? (Causes of Acidity)

1) सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे

2) धूम्रपान व मद्यपान करणे

3) ताणतणाव

4) पोटाचे आजार

पोटाच्या गॅससाठी घरच्या घरी बनवा ही पावडर

अॅसिडिटी दूर करण्यासाठी ओवा खूप फायदेशीर आहे. याची पावडर बनवण्यासाठी २ चमचे ओवा, पाव चमचा हिंग आणि एक चमचा काळे मीठ घ्यावे. आता ओवा भाजून तो थंड करून घ्या.

ओव्याची पावडर करून घ्या. यामध्ये हिंग आणि मीठ मिसळून बारीक करून घ्या. ते एका डब्यात ठेवा. जेव्हा जेव्हा पोटात गॅस तयार होऊ लागतो तेव्हा या पावडरचा अर्धा चमचाच वापर करावा.

जिरे पावडर देखील फायदेशीर

पोटातील गॅस दूर करण्यासाठी आपण जिरे पावडरचे सेवन देखील करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागत नाही , फक्त जेव्हा जेव्हा पोटात गॅस तयार होऊ लागतो तेव्हा अर्धा चमचा जिरे पावडर पाण्याबरोबर खा. जिरे भाजल्यानंतर ते बारीक करून सेवन केले तरच चांगला परिणाम होतो.

जिऱ्यात व्हिटॅमिन ए, बी 6, सी आणि ई तसेच अमीनो अॅसिड आणि मिनरल्स असतात जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी पुरेसे वेगवान असतात. त्याचा परिणाम दाखवूया.

कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ? (acidity home remedy)

– मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.

– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.

– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.

– अन्न चावून चावून सावकाश खावे.

– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.

– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

– गरज नसताना औषधे घेणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT