Asthma Health Tips esakal
आरोग्य

Asthma Care Tips: हिवाळ्यात दम्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

Asthma Care Tips in Marathi: अस्थमाच्या रुग्णांनी हिवाळ्यात मध खावं

सकाळ डिजिटल टीम

Asthma Health Tips : दमा हा एक आहे आजार आहे जो कोणालाही नको वाटतो; वातावरण बदलले की त्याची सर्वात जास्त भीती ही दमा असलेल्या लोकांना असते; त्यात थंडीत तर खूप जास्त त्रास होतो, अशावेळेस नक्की कोणत्या खबरदाऱ्या घ्यावा हा प्रश्न असतोच.

हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण हे अस्थमाचा आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. एवढंच काय तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा या वातावरणाचा त्रास होतो. एकंदरीत श्वासनलिका आकुंचन पावतात आणि कफाचे प्रमाण वाढते.

अशा परिस्थितीत तुम्ही हे उपाय करू शकतात(Natural Asthma Remedies)

१. मध खा

अस्थमाच्या रुग्णांनी हिवाळ्यात मध खावं, यामुळे आपल्या श्वास नलिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि दम्याचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

२. कोमट पाणी वापरा

श्वसनाचे आजार असलेल्यांनी हिवाळ्यात कोमट पाणी प्यावे, यामुळे घसा सुद्धा खराब होत नाही, आंघोळीसाठीही गरम पाण्याचा वापर करावा.

३. बाहेर जाणे टाळा

दम्याच्या रुग्णांनी धुळीच्या आणि धुराच्या ठिकाणी जाणे टाळावे शिवाय हिवाळ्यात सकाळी फिरायला जाणे टाळावे, घरीच योगा करावा.

४. स्वच्छतेकडे विशेष लक्ष

श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, आपले पलंग बेडशीट स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ कपडे घाला.

५. हिवाळ्यातील कपडे

अस्थमाच्या रुग्णांनी थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपडे घालून फिरावे. स्वेटर्स वापरायला काढण्याआधी ते नीट धुवून त्यांना सूर्यप्रकाश दाखवावा.

या गोष्टी खाऊ नका

श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तीने हिवाळ्यात दूध, शेंगदाणे, सोया, अल्कोहोल, अंडी, मासे आणि अति मीठाचे सेवन करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT