Ayurveda esakal
आरोग्य

Ayurveda : एकावेळी 10 रोगांचा नाश करतो आयुर्वेदातला हा सोपा उपाय, फक्त तुपाचा असा वापर करा

आयुर्वेदात हा उपाय खांद्याच्या वरच्या बाजूस होणाऱ्या विकारांवर उत्तम मानला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Ayurveda : आयुर्वेद ही हजारो वर्षे जुनी वैद्यकीय प्रणाली आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक औषधे आणि उपायांद्वारे रोगांवर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. यातीलच एक उपचार पद्धती म्हणजे नस्य (Nasya) ही आहे. आयुर्वेदात हा उपाय खांद्याच्या वरच्या बाजूस होणाऱ्या विकारांवर उत्तम मानला जातो.

आयुर्वेदात म्हटले आहे की 'नासा ही शिरसो द्वारं' म्हणजे नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. डोके, तोंड, केस, दात, कान, नाक, डोळे आणि एकूणच आरोग्याशी संबंधित सर्व विकारांवर नाकाद्वारे उपचाराची पद्धत आयुर्वेदात सांगितली आहे.

नाकातून तुप टाकणे

आयुर्वेदिक उपायामध्ये नाकात तूप टाकण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. असे मानले जाते की दिवसातून दोनदा नाकात तूप टाकल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी नास्य उपचाराचे काही फायदे सांगितले आहेत. ते कोणते ते आज आपण जाणून घेऊया.

नस्य उपाचर पद्धत म्हणजे काय?

डॉक्टरांनी सांगितले की, गाईच्या तुपाचे दोन थेंब सकाळी आणि रात्री नाकात टाकण्याला प्रतिमर्ष नस्य म्हणतात. हा उपाय कोणालाही करता येईल.

नाकात तुप टाकण्याचे फायदे

हा आयुर्वेदिक (Ayurveda) उपाय चांगली झोप, डोकेदुखी (तणाव, मायग्रेनमुळे) आराम करण्यास, त्वचा चमकण्यास, प्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारण्यास, ऍलर्जी कमी करण्यास, मानसिक आरोग्य सुधारण्यास, केस गळणे आणि केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यास, तणाव कमी करण्यास, घोरणे कमी करण्यास मदत करते. आणि मेंदूचे पोषण करते.

नस्य उपाचर पद्धतीने ऑटो इम्यून डिसॉर्डरमध्येही बराच आराम मिळतो. ऑटो इम्यून थायरॉईड, संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिस ग्रस्त लोकांना या उपायाचा खूप फायदा होतो. यामुळे तुम्हाला तणाव, डोकेदुखी, उष्णता थकवा, केस गळणे, अंधुक दृष्टी, निद्रानाश इत्यादीपासून आराम मिळू शकतो.

नाकात कधी आणि किती तुप टाकावे?

डॉक्टरांनी सांगितले की सकाळी किंवा रात्री झोपताना कापूस, ड्रॉपर किंवा करंगळीच्या साहाय्याने दोन्ही नाकपुड्यांमध्ये गाईच्या तुपाचे फक्त 2 थेंब टाकावेत.

डिस्क्लेमर : वरील लेख सामान्या माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT