R. Madhavan’s son Vedant Wakes Up at 4 AM | Starts Day at Brahma Muhurta | Ayurvedic routine sakal
आरोग्य

R. Madhavan Son's Daily Routine: "लवकर झोपा, लवकर उठा!" आर. माधवनचा मुलगा रोज उठतो पहाटे ४ वाजता! आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठणं आरोग्यासाठी का ठरते गेमचेंजर?

Benefits of Waking Up at 4 AM According to Ayurveda: आर. माधवनचा मुलगा वेदांत दररोज पहाटे ४ वाजता उठतो – ब्रह्म मुहूर्तात उठण्यामागचं आयुर्वेदिक रहस्य जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. आर. माधवनचा मुलगा वेदांत दररोज पहाटे ४ वाजता उठतो, जी वेळ 'ब्रह्म मुहूर्त' म्हणून ओळखली जाते.

  2. आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठल्याने आपले आरोग्य सुधारते.

  3. सकाळच्या या शांत वेळेत काही ठराविक कामं केल्यास एकाग्रता, झोपेची गुणवत्ता आणि ऊर्जा वाढते.

Healthy morning habits of Vedant Madhavan rooted in Ayurveda: सकाळची वेळ ही कोणत्याही दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्याची अनमोल संधी असते, असं आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. लवकर झोपा आणि लवकर उठा; हा सल्ला आपले आई-वडील लहानपणापासून देत असतात, आणि त्यामागे खरंच ठोस कारणं असतात.

याच विचाराला दुजोरा देत, प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या मुलाच्या शिस्तबद्ध दिनचर्येबाबत सांगितलं. त्याचा मुलगा वेदांत, जो एक प्रोफेशनल जलतरणपटू आहे, दररोज पहाटे ४ वाजता उठतो आणि आपल्या सरावाला सुरुवात करतो. ही वेळ म्हणजेच 'ब्रह्म मुहूर्त' आयुर्वेदात अत्यंत पवित्र व आरोग्यदायी मानली गेलेली आहो. या वेळेत उठल्याने आपल्याला फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आणि अध्यात्मिक फायदे देखील मिळतात.

मुलाच्या दिनचर्येबद्दल काय म्हणाला आर. माधवन?

प्रसिद्ध इंटरनॅशनल मेन्स मॅगझीन, GQसोबत बोलताना आर माधवनने त्याच्या फिटनेस सिक्रेटबद्दल संगितले. पण त्याचसोबत जेव्हा तो त्याचा मुलगा वेदांतबद्दलही बोलला. तेव्हा त्याने त्याच्या शिस्तबद्ध जीवशैलीबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, त्याचा मुलगा वेदांत रात्री ८ वाजता झोपून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उठतो. ही सवय फक्त त्याच्यासाठीच नाही, तर पालक म्हणून आर माधवनाच्या आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्याचंही भाग बनली आहे. तसेच ब्रह्म मुहूर्त हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम मानला जातो असं तो म्हणाला.

काय आहे ब्रम्ह मुहूर्त ?

ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचा विशेष शांत आणि पवित्र काळ. हा कालावधी साधारणपणे पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान येतो. हिंदू धर्मशास्त्रांनुसार ही वेळ ध्यान, जप, योग आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. आयुर्वेदाच्या मते, या वेळेला उठल्यास आपलं शरीर आणि मन नैसर्गिक ऊर्जेशी, म्हणजेच निसर्गाच्या लयेशी सुसंगत होतं. त्यामुळे या काळात केलेलं कोणतंही काम मनःशांती, शारीरिक आरोग्य आणि सकारात्मकतेला चालना देते.

ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे

मनाची स्पष्टता आणि एकाग्रता वाढते:

पहाटेचा काळ अत्यंत शांत आणि निर्मळ असतो. या वेळी उठल्यावर मन शांत राहतं, विचार स्पष्ट होतात आणि एकाग्रता वाढते. यामुळे अभ्यास, कामकाज किंवा महत्त्वाचे निर्णय घेणं सोपं जातं.

शारीरिक आरोग्यास लाभदायक:

या वेळी हवा शुद्ध आणि प्राणवायूने भरलेली असते, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पहाटे केलेलं व्यायाम किंवा योग पचन सुधारण्यात मदत करतं.

आध्यात्मिक प्रगती:

ब्रह्म मुहूर्त ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. या वेळी मन स्थिर असतं आणि आपण स्वतःशी तसेच देवाशी जोडले जाऊ शकतो.

झोपेचा चक्र नियमित होते:

या वेळेत मेलाटोनिन (झोप नियंत्रित करणारे हार्मोन) उच्च स्तरावर असते, जे शांत मन आणि चांगली झोप देण्यास मदत करते.

उर्जा वाढते आणि तणाव कमी होतो:

लवकर उठल्यामुळे दिवसभर उत्साह टिकतो. एकाच वेळी उठण्याची सवय लावल्यास तणाव, चिंता यावर नियंत्रण मिळवता येते.

झोपेची गुणवत्ता सुधारते:

दररोज एका ठराविक वेळी झोपून आणि उठून झोपेचा दर्जा सुधारतो. ब्रह्म मुहूर्तात उठल्याने शरीराला पूर्ण विश्रांती मिळते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं.

FAQs

  1. ब्रह्म मुहूर्त नेमकी कोणती वेळ असते?
    (What exactly is Brahma Muhurta time?)
    – ब्रह्म मुहूर्त ही सूर्योदयापूर्वी साधारण पहाटे ४ ते ६ वाजेची वेळ असते.

  2. या वेळेत उठल्याने काय फायदे होतात?
    (What are the benefits of waking up during Brahma Muhurta?)
    – या वेळेत उठल्याने मनःशांती, चांगली झोप, एकाग्रता आणि आध्यात्मिक जोडणी अनुभवता येते.

  3. ब्रह्म मुहूर्तात उठण्याची सवय कशी लावावी?
    (How to build the habit of waking up during Brahma Muhurta?)
    – दररोज १५ मिनिटांनी अलार्म लवकर लावा, एक ठराविक झोपेची वेळ पाळा आणि रात्री मोबाईलचा वापर कमी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislature Clash: नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला पोलीस कोठडी; पण किती दिवसांची? विधिमंडळातील प्रवेशाबाबतही मोठा निर्णय

Vidhan Bhavan Clash: महाराष्ट्राचा युपी बिहार झाला का? विधान भवनातील राडा प्रकरणी मनसेचे नेत्याचा सवाल

Latest Marathi News Updates : कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठीत सांगावं लागेल- राज ठाकरे

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात? पायलट लोकांचा असतो विरोध

SCROLL FOR NEXT