Breast Cancer esakal
आरोग्य

Health: स्तनाचा आकार सातत्याने वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या..असू शकतो 'हा' गंभीर आजार

स्तनाचा आकार वाढण्याच्या समस्या तुम्हाला जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ डिजिटल टीम

Breast Cancer: स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये उद्भवणारा सर्वसामान्य आजार असला तरी स्त्रियांनी तो उद्भवण्याआधीच त्याची दक्षता घेणे महत्वाचे ठरते. योग्यवेळी स्तन कँसरवर उपाचार केले गेले नाही तर मृत्यूही होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगामध्ये स्तनांमध्ये घातक कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ होते. स्तनातील पेशी जेव्हा अनियंत्रितपणे वाढायला लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो.

स्तनाच्या कर्करोगाचे चार टप्पे असतात. लक्षणे लवकर समजल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. स्टेज ३ ते ४ मध्ये हा आजार गेल्यास यावर निदान होणे कठीण असते. ऑक्टोबर महिना 'स्तन कर्करोग जागरूकता २०२२' म्हणून साजरा केला जातो. स्तनाचा कर्करोग स्त्रियांसाठी कसा घातक ठरू शकतो याबाबत जागृकता समाजामध्य पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमाला 'पिंक ऑक्टोबर' असेही म्हटले जाते.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

अमेरिकन महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा अतिसामान्य मानला जातो. स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी मॅमोग्राम हा सर्वोत्तम मार्ग आहे. जाणून घ्या कर्करोगाची लक्षणे

स्तनाच्या आकारात बदल होणे

स्तनाच्या भागात वेदना

स्तनातून दुधाव्यतिरिक्त द्रव्य घटकाचा त्राव

स्तन किंवा अंडरआर्ममध्ये नवीन गाठी किंवा लम्प तयार होणे

स्तनग्रामाच्या आकारात बदल, वेदना किंवा लालसरपणा

स्तनांमध्ये वेदना, सूज किंवा कडकपणा जाणवणे

स्तनाच्या कर्करोगाची कारणे

अनेकदा वयानुसार स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

स्तनाच्या कर्करोग ५० किंवा त्यापेक्षा अधिक वय लोकांमध्ये दिसून येते.

कौटुंबिक इतिहासामुळे किंवा लवकर मासिक पाळी येण्याच्या त्रासामुळेही स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

तसेच आरोग्याकडे दूर्लक्ष करणे, व्यायाम न करणे, शारीरिकदृष्ट्या असक्रियतेमुळेही कर्करोगाचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT