आरोग्य

Health Tips : जेवताना पाणी प्यावे की नको? ऐका तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

डॉक्टर जेवणाच्या मध्ये पाणी न पिण्याचा सल्ला देतात. जेवणाच्या मध्ये पाणी पिणे पचन क्षमतेसाठी धोकादायक असते, असा समज आजवर आपला होता. पण, एका आहारतज्ज्ञांच्या मते, या समजुतीत कोणतेही तथ्य नसून पाणी न पिणे यामुळे तुमची पाणी पिण्याची सवय बंद होऊ शकते.

जर जेवताना किंवा जेवणानंतर पाणी प्यायला आपण टाळाटाळ केली तर पुढील ३ तास आपण विना पाण्याचे राहू. जेवण करताना पाणी पिऊ नये असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे आहारतज्ज्ञ भुवन रस्तोगी यांनी म्हटले आहे. रस्तोगी त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबाबत स्पष्ट केले आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जेवणासोबत किंवा नंतर पाणी प्यायल्याने पचन एंझाइम कमकुवत होतात आणि त्याचा परिणाम पचनावर परिणाम होतो. याचे समर्थन करण्यासाठी सध्या कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यामुळे त्यात काही तथ्य नाही.

पुढे रस्तोगी म्हणतात की, “जेवल्यानंतर पाणी न पिणे खरोखर हाणीकारक ठरू शकते. कारण यामुळे आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

जे लोक जेवताना पाणी पित नाहीत. ते दररोज 3 किंवा 4 लिटर पाणी पिऊ शकत नाहीत. त्यांना डिहायड्रेशनचे गंभीर परिणाम दिसून येतात. अशा लोकांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी स्टोन, यूटीआय इत्यादी सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असेही रस्तोगी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT