Cardamom Tea esakal
आरोग्य

Cardamom Tea : वेलची चहा पिण्याचे आहे भरपूर फायदे, हार्टसोबतच शरीराला मिळतात एवढे फायदे

चहाचे चाहते सगळीकडेच बघायला मिळतात. पण हा चहा आरोग्यासाठी कसा हेल्दी बनवता येतो जाणून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

Cardamom Tea Health Benefits : चहाचे चाहते जगभरात सापडतात. जगातलं सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या प्येयांमध्ये चहाचा दुसरा क्रमांक लागतो. काही लोक जणू चहावर जगतात तर काहींना आपल्याला हवा तसा परफेक्ट चवीचाच चहा हवा असतो. तर काही जण चहाच्या चवीसाठी चहा पितात. त्यामुळे प्रत्येक भागानुसार चहा बनवण्याचे, त्याच्या चवीचे वेगवेगळे प्रकार आढळतात. चहा अनेक प्रकारे बनवला जातो. पण वेलची टाकून चहा बनवल्याने चवही छान लागते आणि त्याचा आरोग्याला फायदा मिळतो.

फायदे जाणून घेऊया

पचन क्रिया सुधारते - वेलची चहा पिण्याने पचन सुधारते. यात फायबर असल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडीटीसारख्या समस्या होत नाही.

हार्ट हेल्दी - वेलची चहा पिल्याने तुमचे हृदय हेल्दी राहतं आणि बॉडी ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं राहतं.

घसा खवखवणे - वेलची चहा प्यायल्याने घशाची खवखव दूर होते. कारण यात अँटीबॅक्टोरीयल गुण असतात. जे घशाचं इंफेक्शन दूर करण्याचं काम करतात.

रोगप्रतिकारक शक्ती - वेलची मध्ये व्हिटॅमिन सी असल्याने याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

तोंडाची दूर्गंधी - तोंडाची दुर्गंधी यामुळे दूर होते. त्यामुळे जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर असा चही प्या. यामुळे तोंडाशी निगडीत त्रास दूर होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT