Covid Returns! लहान मुले, को-मॉर्बिड, गर्भवतींची घ्या 'अशी' काळजी Sakal
आरोग्य

Covid Returns! लहान मुले, को-मॉर्बिड, गर्भवतींची घ्या 'अशी' काळजी

Corona Returns! मुले, को-मॉर्बिड, गर्भवतींची घ्या 'अशी' काळजी

तात्या लांडगे

'सुदृढ कुटुंब' कसे असावे याचा आदर्श काही कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) संकटात सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) दोन लाखांहून अधिक तर राज्यातील जवळपास 67 लाख व्यक्‍ती बाधित झाल्या. त्यामध्ये एक लाख 41 हजारांहून अधिक जणांचा मृत्यूही झाला. तरीही, अनेक कुटुंबं कोरोनापासून दूर राहिली आहेत. त्यांनी नियमित व्यायाम, वेळेत पौष्टिक आहार (Nutrition) आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय तपासणी केली. तसेच वेळेत कोरोना प्रतिबंधित लसीही (Covid Vaccine) टोचून घेतल्याने ते सुदृढ राहिल्याची बाब अधोरेखित झाली आहे. (Care to be taken by infants as well as co-morbid and pregnant women on the background of corona disease)

'सुदृढ कुटुंब' (Healthy Family) कसे असावे याचा आदर्श काही कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला. मुलांच्या शाळा (School) बंद असतानाही त्यांनी त्यांच्या व्यायामाबरोबरच आहाराकडे लक्ष दिले. घरातील ज्येष्ठ नागरिक विशेषत: ज्यांना पूर्वीचे आजार (उच्च रक्‍तदाब (BP), टीबी (TB), कर्करोग (Cancer), किडनी, हृदयाचे आजार व इतर) आहेत, त्यांची वेळेत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या औषधोपचाराकडे विशेष लक्ष दिले. त्यांचे नियमित चालणे, हलका व्यायाम, जेमतेम आजारांकडेही लक्ष दिल्याने अनेकजण या संकटापासून दूर राहिले. दुसरीकडे, कुटुंबातील गर्भवती महिलांच्या गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी, यासाठी त्यांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घेतली. कुटुंब नियोजनाच्या (Family Planning) माध्यमातून दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले. त्या महिलांच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिल्याने त्यांची प्रकृती सुदृढ राहिली. दुसरीकडे, ज्यांनी अशा बाबींकडे दुर्लक्ष केले, त्यांना कोरोनामध्ये मोठा फटका सोसावा लागला. कोरोनाचे संकट अजूनही गेले नसून सर्वांनी 'माझे कुटुंब माझीच जबाबदारी' अंतर्गत स्वत:बरोबरच कुटुंबातील सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

चिमुकल्यांची 'अशी' घ्या काळजी...

  • लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारकशक्‍ती (Immunity) अधिक; तरीही नियमित वैद्यकीय तपासणी गरजेची

  • बैठे कामे देऊ नयेत; ऑनलाइन (मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप) साधनांचा अतिवापर नकोच

  • जेवणात हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables), काकडी, टोमॅटो, गाजर, लिंबू, बोर, चिंच, डाळी, अंडी, उसळ असावी

  • शाळा बंदमुळे आळसाबरोबरच शारीरिक व्याधी वाढल्या; नियमित सायकलिंग, चालणे असा व्यायाम करावा

को-मॉर्बिड (Co-Morbid) रुग्णांसाठी...

  • डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार संबंधितांनी करून घ्यावी नियमित वैद्यकीय तपासणी

  • वेळेवर जेवण, सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम (पायी चालणे) करावा

  • किडनीचे विकार असलेल्यांनी प्रोटिनयुक्‍त पदार्थ खावेत तर डायबेटीस झालेल्यांनी उपवास करू नये

  • जेवणात फळे, हिरव्या भाज्या, दूध असावे; डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणेच आहार असावा

गर्भवती मातांच्या सुरक्षिततेसाठी...

  • कोरोनामध्ये गर्भवतींनी कोवॅक्‍सिन लसीचे दोन्ही डोस घ्यावेत

  • कुटुंब नियोजनाअभावी दोन मुलांमधील अंतर झाले कमी; मातेची प्रकृती चांगली राहण्यासाठी नियोजन गरजेचेच

  • गरोदरपणात रक्‍तदाब वाढीच्या अनेक घटना; कोरोना असला तरीही वैद्यकीय तपासणी वेळेतच करावी

  • पालकांनी लहान वयात मुलींचा विवाह करू नये; ती सुदृढ झाल्यानंतरच करावा विवाह

कोरोना असो वा नसो, सर्वांनी स्वत:सह कुटुंबीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी लक्ष द्यायलाच हवे. नियमित व्यायाम, प्रथिनेयुक्‍त आहार, निवांत झोप याकडे लक्ष द्यायला हवे. कोरोना संकटात अनेक कुटुंबं त्या आजारापासून दूर राहिली. त्यांनी आरोग्याच्या (Health) मूलभूत गोष्टींवर सर्वाधिक भर दिल्याने ते निरोगी राहिले. तरीही, त्यांनी प्रतिबंधित लस टोचून घेतली आहे.

- डॉ. वैशाली शिरशेट्टी (Dr. Vaishali Shirshetti), जिल्हाध्यक्षा, बालरोगतज्ज्ञ (Pediatricians) संघटना, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

DMart New Sale : नवा आठवडा, नवा सेल! डीमार्टमध्ये उद्यापासून स्पेशल ऑफर सुरू, कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा एका क्लिकवर

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT