Child Care esakal
आरोग्य

Child Care : सर्दी खोकला झाल्यास मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो? या घरगुती उपायांनी करा बचाव

आज आम्ही तुम्हाला काही घरघुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना संसर्गापासून वाचवू शकता.

साक्षी राऊत

Child Care : हिवाळ्यात मुले अनेकदा आजारी पडतात. बदलत्या ऋतूमध्ये मुलांना सर्दी, ताप, न्यूमोनियाचा धोका वाढतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे. घरगुती उपायांनी त्यावर उपचार करता येत नाहीत. पण संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या मुलांना न्यूमोनिया आणि इतर आजारांपासून सुरक्षित ठेवू शकता. हिवाळ्यात व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे मुलांना अनेकदा न्यूमोनिया होतो. तेव्हा आज आम्ही तुम्हाला काही घरघुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना संसर्गापासून वाचवू शकता.

न्यूमोनिया का होतो?

न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे, ज्यामुळे वायुमार्गात अडथळा येतो. या आजारात फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांमध्ये द्रव भरल्यामुळे सूज येते. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीस खोकला, कफ आणि तापाचा त्रास होऊ लागतो. या समस्या कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जास्त उद्भवतात.

मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे काय आहेत?

न्यूमोनियाची बहुतेक लक्षणे फ्लू सारखीच असतात.

खोकला येणे

कफ तयार होणे,

ताप येणे (थरथरणे)

श्वास घेण्यास त्रास होणे,

खोकताना छाती आणि घशात दुखणे.

मुलांना न्यूमोनियापासून वाचवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?

जेव्हा हवामान बदलते तेव्हा मुलांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. खरे तर थंडीच्या दिवसांत दुर्लक्ष केल्यामुळे मुले न्यूमोनिया व इतर संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही मुलांना या आजारांपासून सुरक्षित ठेवू शकता.

हळद घातलेले पदार्थ

हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. हिवाळ्यात मुलांना विषाणूंपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते. जर मूल मोठे असेल तर ऋतू बदलताच मुलाला हळदीचे दूध देणे सुरू करा. पण जर तो लहान असेल तर पाण्यात हळद गरम करून मुलाच्या छातीवर मसाज करा. यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये बालकांना आराम मिळतो.

लवंगाचे पाणी फायदेशीर

जर मुल १० वर्षांपेक्षा मोठे असेल तर तुम्ही त्याला लवंगाचे पाणी देऊ शकता. पाण्यात २ ते ३ लवंगा आणि काळी मिरी घालून उकळा. यानंतर, ते हलके कोमट करा आणि अर्धा कप मुलाला प्यायला द्या. याशिवाय मुलांच्या छातीवर लवंगाच्या तेलाने मालिश केल्याने त्यांना आराम मिळतो आणि न्यूमोनियापासून बचाव होतो.

तुळसचा काढा

तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. बाळाला न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांच्या रसात काळी मिरी मिसळून बाळाला देऊ शकता. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म मुलाचे विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण करतात.

लसणाचा उपायही फायदेशीर

लसणाचा उपयोग कफ दूर करण्यासाठी केला जातो. लसणाच्या काही पाकळ्यांची पेस्ट बनवा आणि रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट मुलाच्या छातीवर लावा. यामुळे मुलाच्या छातीला ऊब मिळते आणि कफ बाहेर येऊ लागतो. (Baby Care)

जर मुलाला न्यूमोनिया झाला असेल तर डॉक्टरांना भेटा आणि त्याच्यावर योग्य उपचार करा. यासोबतच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर घरगुती उपाय देखील करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT