Child Mental Health  esakal
आरोग्य

Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

कोविड काळातील ऑनलाइन क्लासेसमुळे स्मार्टफोन हा मुलांच्या आयुष्यात अत्याधिक महत्वाचा झालाय

साक्षी राऊत

Child Mental Health : तुम्ही तुमचा पहिला फोन कधी खरेदी केलाय याबाबत तुम्हाला आठवतंय का? मुलं दहावीतून अकरावीत केले किंवा मुलगा, मुलगी मोठे झाले की त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून आईवडील मुलांना मोबाइल घेऊन देतात. कमी वयातच मुलांकडे त्यांचे स्वत:चे सोशल मीडिया अकाउंटसुद्धा असते. मात्र याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतो याची कल्पना तुम्हाला आहे का?

मागल्या काही दिवसाआधी Mcafee च्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की १४ वर्षांमधील 83% टक्के मुलांजवळ स्वत:चा स्मार्टफोन आहे. आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते त्यांच्या आई-वडिलांच्या स्मार्टफोनवर अॅक्टिव्ह असतात. कोविड काळातील ऑनलाइन क्लासेसमुळे स्मार्टफोन हा मुलांच्या आयुष्यात अत्याधिक महत्वाचा झालाय.

मुलांना कुठल्या वयात पहिला स्मार्टफोन द्यावा

हल्ली लोक २-३ वर्षांच्या मुलांच्या हातातसुद्धा मोबाईल देतात. यूट्यूबवर ही मुलं कमी वयापासूनच अॅक्टिव्ह असतात. त्यांना स्मार्टफोनची सवय फार कमी वयात झाल्याने १० वर्षाच्या वयात ते पर्सनल स्मार्टफोनसाठी हट्ट करू लागतात.

स्मार्टफोनचे व्यसन घातक

सध्याचा काळ माहिती तंत्रज्ञानाचा असल्याचे वेलनेस प्रशिक्षक डॉ.कोमल सिंग सांगतात की, एखाद्या मुलाला स्मार्टफोनचे व्यसन लागले तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. स्मार्टफोनच्या दुनियेत मुले मग्न झाली की आजूबाजूच्या जगाशी त्यांचा संबंधच उरत नाही. ही परिस्थिती त्यांच्या करिअरसाठी, आरोग्यासाठी आणि नातेसंबंधांसाठी अजिबात फायदेशीर नाही.

कमी वयात मोबाइलच्या वापराने मुलांमध्ये वाढतंय मानसिक आजारांचं प्रमाण

६ वर्षीय मुली - या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण ७६%

१० वर्षीय मुली - या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण ६१%

१५ वर्षीय मुली - या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण ५२%

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुली - या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण ४६%

मुलांमध्ये तुलनेत प्रमाण कमी

६ वर्षीय मुले - या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण ४२%

१८ वर्षीय मुले - या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण ३६%

तरुण वयात फोन म्हणजे वाईट मानसिक आरोग्य, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे

सॅपियन लॅब्सच्या जागतिक संशोधन अहवालात असे दिसून आले आहे की ज्या मुलांकडे लहान वयात स्मार्टफोन आहेत त्यांचे मानसिक आरोग्य भविष्यात अधिक वाईट आहे. त्यांच्या तुलनेत जे लोक उशिरा स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात करतात ते मानसिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त असतात.

संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या मुली वयाच्या 6 व्या वर्षी स्मार्टफोन वापरतात, 76% प्रकरणांमध्ये त्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडतात. तर 18 वर्षांच्या वयानंतर स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात करणाऱ्या तरुणांमध्ये केवळ 46% प्रकरणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त असल्याचे प्रमाण आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Ayodhya Ram Mandir Flag : राम मंदिरात PM मोदी करणार ध्वजारोहण; सहा हजार पाहुणे होणार सहभागी, कशी आहे सुरक्षा व्यवस्था ?

Viral News : मंदिरात जाताच अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले १६ हजारांचे शूज, संतापलेल्या इंजिनिअरला पुजाऱ्याकडून मिळाले 'हे' उत्तर

Latest Marathi Breaking News : बुलढाण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT